1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उपराजधानीत झाले शिवबंधन सैल

shekhar sawarbandhe
Spread the love

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी परवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर शिवसैनिकांत असलेला असंतोष उफाळून येत आहे. अनेकांनी सेना सोडण्याची तयारी चालवली असल्याची माहिती आहे. अशात शहरातील सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांना विचारणा झाली आहे. निरोप पाठवून त्यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेत मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्याने शिवसेनेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेची मुंबईतून दखल घेण्यात आली असून नागपूरमधील उफाळून आलेल्या असंतोषाचे कारण काय, अशी विचारणा माजी पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सावरबांधे यांच्यापाठोपाठ अनेक पदाधिकारी सेना सोडण्याच्या तयारीत आहेत. यात एका नगरसेवकाचाही समावेश असल्याचे कळते. स्थानिक नेत्यांमुळे अनेक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. मोठी पदे दिली तर त्यांना निर्णय घेण्याचे अधिकारसुद्धा देण्यात आले नाही. काहींना मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बोलण्यासही मनाई करण्यात आल्याचे समजते. शिवसेनेत प्रवेश करून फसलो, अशी भावना आता अनेक पदाधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी शिवसेनेत मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मोदीविरोधात एकमेव पर्याय म्हणजेच शरद पवार

    April 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसंजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य देशात मोदींविरोधात एकमेव पर्याय म्हणजेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार होय. ...

    परदेशात पीएचडीसाठी रजा देणे अशक्य; ‘ग्लोबल टीच...

    January 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदीड महिन्यांपासून रजेचा अर्ज टेबलावरच सोलापूर जिल्हा परिषद परितेवाडी शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक...

    डावपेचांना समजून घेणे अत्यंत आवश्यक; रणजित मेश्राम

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveधर्म आणि सामाजिक दास्याच्या जोखडाने उध्वस्त झालेल्या माणसाला बाबासाहेबांच्या प्रयत्नाने मिळालेली सुखाची संध...