1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जागतिक टपाल दिनी शिवराज मोरेंचे मोदींना पत्र; ‘जन की बात’ कधी ऐकणार?

postoffice
Spread the love

आज जागतिक टपाल दिनानिमित्त आपल्याला जाहीर पत्राच्या माध्यमातून मोदीजी आपणास हे विचारतोय. जनता तुमच्याकडे आशेने पाहतेय.उत्तर द्या आदरणीय पंतप्रधानजी, तुम्ही नाही दिलं तर दर 5 वर्षांनी जनता अपेक्षित उत्तर देतच असते आणि ते नक्की मिळेल, असा विश्वास आहे. अशा आशयाचे पत्र युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी लिहिले आहे.

पत्रात शिवराज मोरे म्हणाले आहेत की, पत्रास कारण की, पंतप्रधान म्हणून देशातील प्रत्येक घडामोडीवर आपले लक्ष असतेच, पण पुढे काहीही होत नसल्याचे दिस म्हणून काही मुद्द्यांवर या पत्राद्वारे मी आपले लक्ष वेधू इच्छितो! जनतेने सलग दोन टर्म आपल्या हाती मोठ्या विश्वासाने देशाची सत्ता सोपवली. निवडणुकीपूर्वी आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बदल होईल, ही अपेक्षा होती. त्यानुसार बदलही झाला, पण तो सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात नाही तर केवळ आपल्याच काही मोजक्या मित्रांच्या आयुष्यात झाला. यामुळे जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. देशातील तरुण प्रचंड निराश आहे. त्याच्या हाताला काम नाही. आपले मित्र असलेले मोजके उद्योगपती मालामाल तर बाकी छोट्या मोठ्या उद्योगांचे प्रचंड हाल आहेत.

उद्योग बंद पडत आहेत. व्यापारी कर्जबाजारी आणि शेतकरी देशोधडीला लागलाय. देशात बिनदिक्कतपणे घुसखोरी होतेय.. पेट्रोल-डिझेल, घटगुती सिलिंडरचे दर आकाशाला भिडले. महागाईने सामान्य जनता जर्जर झाली पण आपल्याला जराही तमा दिसत नाही. लोकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करता येत नाही. केसर आंदोलकांना भरदिवसा गाडीखाली चिरडलं जातं. जगणं महाग झालं आणि मरण स्वस्त. हे आणखी किती काळ जनतेने सहन करायचं? आपण पंतप्रधान आहात एरवी तासन तास “मन की बात” झोडता पण या “जन की बात” वर आपण काही बोलणार की नाही?

आज जागतिक टपाल दिनानिमित्त आपल्याला जाहीर पत्राच्या माध्यमातून हे विचारतोय… जनता तुमच्याकडे आशेने पाहतेय. उत्तर द्या, आदरणीय पंतप्रधान! तुम्ही नाही दिले तर पाच वर्षांनी जनता अपेक्षित उत्तर देत असते आणि ते नक्की मिळेल, असा विश्वास आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण भरारी’

    August 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपहिल्यांदा भारताच्या खात्यात पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या पदकाची कमाई नवी दिल्ली : यंदाच्या राष्ट्रकुल स्प...

    चंद्र आणि मंगळावर सुद्धा चित्रपट; शुटींग साठी तयार ...

    October 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveरशियन चित्रपट दिग्दर्शक क्लिम शिपेन्को यांनी ते चंद्र आणि मंगळावर सुद्धा चित्रपटाचे शुटींग करण्यास तयार असल...

    मुल्ला बरादर आणि हक्कानी आमने- सामने ! पाकमुळे तालिब...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी तालिबानमध्ये अंतर्गत गटबाजी समोर येत आहे. यामध्ये तीन मुख्य नावे आ...