1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘तो कार्यक्रम मनसेचा नाही’ वसंत मोरे नाराज? मनसेत मतभेद?

Spread the love

मनसेकडून (MNS) उद्या पुण्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून आज ते पुण्यात दाखल झाले.
उद्या त्यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालिसाचं सामूहिक पठण देखील होणार आहे.
या कार्यक्रमाचे पुण्यात ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूजननायक असा करण्यात आला आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष बदलीनंतर राज ठाकरे यांचा हा पहिला पुणे दौरा आहे.
मनसेत मतभेद?
पण याधीच पुण्यात मनसेत मतभेद असल्याचं समोर आलं आहे. पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला जायचं की नाही अजून ठरवलं नाही, उद्या सकाळी राज ठाकरे यांची भेट घेणार असून आपली भूमिका मांडणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
तसंच हनुमान चालिसा कार्यक्रमाच्या पत्रिकेवर कुठेही मनसेचं नाव नाही, तो पक्षाचा कार्यक्रम आहे की नाही हे माहीत नसल्याने अजून ठरवलं नाही असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. उद्या कार्यक्रम हा पक्षाचा नसून तो अजय शिंदे यांचा कार्यक्रम आहे, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा प्रकरणारवर केलेल्या वक्तव्यानंतर आपल्या प्रभागात भोंगे काढणार नाही आणि हनुमान चालिसाही म्हणणार नाही अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. त्यानतंर लगेचच वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
आता पुन्हा एकदा उद्याच्या कार्यक्रमानिमित्ताने मनसेत असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मराठा सेवा संघाकडून अजून प्रस्तावच आलेला नाही; चंद्र...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठा सेवासंघ ३२व्या वर्षात पदार्पण करत असताना आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम ...

    फडणवीसांना निमंत्रण नाही, हिसाब तो जरूर होगा!’, निते...

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या...

    मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं; देवेंद्र फड...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमी मुख्यमंत्री नाही हे मला जनतेने जाणवूच दिलेलं नाही असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्...