1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”; पंतप्रधान मोदी

auditorium-thefreemedia
Spread the love

नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा काळ खूप महत्वाचा आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. येणाऱ्या २५ वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला अनेक नवे संकल्प करायचे आहेत.”

तसेच हे अधिवेशन महत्वाचं आहे. या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. “आम्ही नेहमी सभागृहाला संवादाचं सक्षम माध्यम मानतो, लोकशाहीचे तीर्थक्षेत्र मानतो, जिथं खुल्या मनानं संवाद होतात. गरज पडल्यास वादविवाद व्हायला पाहिजे. विश्लेषण झालं पाहिजे. त्यामुळे माझं सर्व सदस्यांना आवाहन आहे की गहन चर्चा व्हाव्यात. उत्तम चर्चा आवश्यक आहे. यासाठी सर्वांचं सहकार्य हवं. सर्वांच्या प्रयत्नानं सभागृह चालतं. त्याने चांगले निर्णय सदनात घेतले जातात,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात एकूण १८ बैठका होणार असून २४ विधेयकं मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने रविवार, १७ जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी सुमारे २५ मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यात कोरोनाचा उद्रेक; निर्बंध नको असतील तर, शिस्त...

    June 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यात कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे...

    वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची ॲड...

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच...

    ‘सार्क’ची नियोजित बैठक रद्द

    September 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने शनिवारी होणारी “सार्क’ गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रद्द कर...