1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सायगव्हाण शाळेत १२ ते १४ वयोगटातील मुलांना कार्बोव्हैक्सचा पहिला डोस

Coronavirus Booster Vaccine
Spread the love

वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, सायगव्हाण येथील १२ ते १४ वय वर्ष पूर्ण झालेल्या मुला मुलींना ‘कार्बोव्हैक्स’ चा पहिला डोस आज दि. २३ मार्च रोजी दुपारी शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने मुख्याध्यापक पाटील आर जी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

जिल्हा परीषद वर्धा आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड व उपकेंद्र पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभागाची टीम जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा सायगव्हाण येथे दुपारी दाखल झाली. वय वर्ष १२ पूर्ण झालेल्या मुला मुलींची यादी तयार करून अपडेट आधार कार्डासह पालकांना बोलावण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सक्रीय सहभाग घेऊन मदत केली. शा व्य स चे सदस्य अतुल आडकीने, जरीले, उषाताई क्षीरसागर, सोनवणे ताई, आदींनी सहकार्य केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड येथील डॉ चेतन आडे, आरोग्य सेविका भारती मून, आशासेविका सीमा वानखेडेव रूपाली सातक यांनी ‘कॉर्बव्हैक्स’चा पहिला लसीचा डोस मुला मुलींना दिला. शाळेतील वर्ग ६ व ७ वीच्या मुला मुलींना पहिला डोस त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत देण्यात आला.

याप्रसंगी लसीकरणानंतर डॉ चेतन आडे यांनी पालक व विद्यार्थ्यांना लसीकरणाचे फायदे यावर मार्गदर्शन केले. २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार असल्याचेही डॉ आडे यांनी यावेळी सांगितले. आज पिंपळगाव उपकेंद्रांतर्गत आदर्श विद्यालय, केंद्र शाळा पिंपळगाव व सायगव्हाण येथे लसीकरण मोहिम राबविण्यात आल्याचेही याप्रसंगी डॉ. आडे यांनी सांगितले. सायगव्हाण येथील पालक, नागरिक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मुख्याध्यापक पाटील यांचे आरोग्य विभागाच्या वतीने आभार मानले.

Claim Free Bets

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपुरात शिवसेनेचा काँग्रेस विरोधात प्रचार, तर भाजपच...

    September 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 16, तर पंचायत समितीच्या 31 जागांवर प्...

    राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरू होणार

    June 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveतर विदर्भातील शाळा २४ ते २५ जूनपासून मुंबई: राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी...

    नागपुरात शिकाऊ महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न

    November 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्‍या (मेडिकल) ई लायब्ररीजवळ शिकाऊ (इंटर्न) महिल...