1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यसरकारच्या चौकशीला आव्हान देणारी परमबीर सिंहांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

parambir singh
Spread the love

उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना चौकशीच्या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिला आहे. आपल्या विरोधातील चौकशीला आव्हान देत परमबीर सिंह यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत केलेल्या मागण्यांबाबत उच्च न्यायालय निर्णय देऊ इच्छित नसल्यामुळे परमबीर यांनी योग्य त्या लवादापुढे जाऊन दाद मागावी. तसेच उच्च न्यायालयाच्या कुठल्याही निर्देशांच्या प्रभावाखाली लवादाने न राहता स्वतंत्र सुनावणी घेत यावर निर्णय द्यावा, असे निर्देश न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.ज. जमादार यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात दिले आहेत. 26 जुलै रोजी यासंदर्भात आपला निकाल खंडपीठाने राखून ठेवला होता.

परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप, एकापाठोपाठ दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी विविध याचिका दाखल केल्या आहेत. अश्याच एका प्रकरणात निलंबन रद्द करण्यासाठी परमबीर यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांनीही केला आहे. राज्य सरकारने याची दखल घेत परमबीर यांची एसीबीमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचा निर्णय घेतला. परमबीर यांनी ही चौकशी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ दरायस खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले की, परमबीर यांनी आपली तक्रार केंद्रीय प्रशासकीय लवादासमोर (कॅट) मांडायला हवी होती, पण मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका केली. त्यांच्या या याचिकेत तथ्य नसल्यामुळे ती फेटाळून लावण्यात येत आहे, असे उच्च न्यायलयाने नमूद केले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी फ...

    December 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध प्रथमश्रेणी न्यायदंड...

    अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची मैफल नाशिकच्या भुजबळ न...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपण…तारखांचा मेळ जुळता जुळेना! नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मैफल भुजबळ नॉ...

    अखेर भाजप-मनसेची हातमिळवणी; जागांसंदर्भात झाला महत्व...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युती होणार...