1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुंबईकरांची धाकधूक वाढली!

Covid Cells
Spread the love

ऑफ्रिकेतून मुंबईत दाखल झाले 87 जण, त्यातील दोघे पॉझिटिव्ह

संपूर्ण जगाची धाकधुक कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा वाढवली आहे. जगभरातील सर्वच देशांनी दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडून मुंबईसह राज्यात या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. दुसरीकडे मुंबईत आफ्रिकेतून 87 जण दाखल झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली असून या सर्वांना ट्रेसिंग करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यातील डोंबिवलीमधील दोघे कोरोनाबाधित आले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पण ओमिक्रॉनची लक्षणे या दोघांमध्ये आहेत की नाही याची टेस्ट अद्याप बाकी आहे.

याबाबत माहिती देतान महापौरांनी सांगितले की, आता सगळ्यांनीच ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सतर्क होण्याची गरज आहे. कोविड सेंटर सज्ज असून आता ते पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करावे लागणार आहेत. डॉक्टर , नर्स स्टाफ आपल्याकडे आहेत. विमानतळाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्या म्हणाले. बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कुटुंबियांची चाचणी केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. जगभरातील सर्वच देश ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकन देशांतून उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोरोनाची खबरदारी घेत वाजणार शाळांची घंटा

    June 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveशाळांमध्ये मास्कसक्तीचा निर्णय काही दिवसांत : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुंबई: राज्यात पुन्हा कोरोनाने डोक...

    “किंवा तू तरी गांजा मारून व्हिडिओ पोस्ट केलाय&...

    October 26th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveसध्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरण चांगलच तापलंय. आर्यन खान, एनसीबी, समीर वानखेडे, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्या...

    विश्वमैत्री व क्षमापना पर्व सामान्यांसाठी मार्गदर्शक...

    September 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वच धर्मांनी मानवजातीला एकसूत्राने बांधले आहे. जैन धर्माने जगाला अहिंसा, अपरिग्रह, क्षमा आणि मैत्र...