1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

युक्रेनने ‘या’ चार अटी मान्य केल्या तरच युध्द थांबेल

Spread the love

देशभरात मागील काही दिवसापासून सुरु असलेले रशीया युक्रेन युद्धाचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाचा भडका अजूनही कायम आहे. दोन्ही देशातील लष्करी संघर्ष सुरू होऊन १२ दिवस झाले आहेत. दोन्ही देशात चर्चा सुरू असली, तरी युद्ध थांबण्याचे दिशेनं अद्याप तरी कोणतंही पाऊल पडलेलं नाही. दरम्यान रशियाने आता युक्रेनसमोर चार अटी ठेवल्या असून, त्या मान्य केल्यास तत्काळ युद्ध थांबवू, असं म्हटलं आहे.

युक्रेनच्या माध्यमांनी असं म्हटलं आहे की, रशियाने आता युक्रेनसमोर चार अटी ठेवल्या आहेत. या चार अटी युक्रेनने मान्य केल्यास रशियाकडून सुरू असलेली लष्करी कारवाई तत्काळ थांबवली जाईल.

रशियाने नेमक्या काय अटी ठेवल्या आहेत?

१) रशिया सरकारने युक्रेनसमोर ठेवलेल्या चार अटींपैकी पहिली अट अशी आहे की, युक्रेननं तत्काळ लष्करी कारवाई थांबवावी. ‘क्रेमलिन’च्या एका प्रवक्त्याने म्हटलं आहे की, “आम्ही युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबवू, पण त्यासाठी युक्रेनच्या लष्कराला रशियाविरोधातील कारवाई बंद करावी लागेल. युक्रेननं असं केलं तर आम्ही कुणावरही गोळी चालवणार नाही.”

Claim Free Bets

२) रशियाने दुसरी अट युक्रेनच्या संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे. युक्रेनचा युरोपीय संघ आणि नाटोमध्ये सहभागी होण्याकडे कल आहे. मात्र, रशियाने याला विरोध केला आहे. युक्रेन कोणत्याही संघटनेत सहभागी होणार नाही, असा बदल सरकारने युक्रेनच्या संविधानात करावा, असं रशियाने म्हटलं आहे.

३) रशियाने युक्रेनसमोर तिसरी अट ठेवली आहे, ती क्रिमिआची. क्रिमिआ रशियाचा भाग असल्याची मान्यता युक्रेननं द्यावी. क्रिमिआ रशियाचाच भाग होता. १९५४मध्ये सोव्हिएत संघाचे नेते निकिता ख्रुश्चेव यांनी हा प्रांत युक्रेनला दिला होता. २०१४मध्ये रशियाने हा प्रांत परत ताब्यात घेतला होता.

४) डोनेत्स्क आणि लुहान्स्क यांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. युक्रेननेही या दोन्ही प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली असून, या अटी मान्य केल्या, तर तत्काळ लष्करी कारवाई थांबवू असं रशियाने म्हटलं आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘Omicron’ नावाच्या नव्या वेरिएंट असू शकत...

    November 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveसध्या देशात परत कोरोनाच्या नवीन वेरिएंट ‘Omicron’ मूळे परत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तस...

    अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्य...

    July 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या 2003 परिषदेच्या आंतरसरकारी समितीचा सदस्य ...

    तालिबान अखेर नमलं; मंत्रिमंडळात महिलांना स्थान देऊ म...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबानने आपल्या मंत्रिमंडळात आता महिलांच्या समावेशाबाबत महतवाचा निर्णय घेतला आहे. तालिबानचे प्रवक्ते सुहेल...