1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

हिंगणघाटच्या मोहता मिल मजूरांवर उपासमारीची वेळ

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

आज साखळी उपोषणाचा पाचवा दिवस

वर्धा/हिंगणघाट: आर. एस.एस. मोहता मिल हिंगणघाट येथील मिलमध्ये अनेक वर्षापासून बरेच कामगार कार्यरत आहे. उपजीवीकेचे मुख्य साधनच मिलमध्ये असलेली नोकरी आहे. भारत सरकारने आमची शेकडो एकर शेती कवडीमोल भावाने मिल मालकाला दिली व करोडो रुपयाचे कर्ज देण्यात आले. परंतु मिल मालक व प्रशासनाने हजारो करोडो रुपयाचा घोटाळा करुन मिल दि. ६ मे २०२१ पासून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता मिल बंद करुन सर्व पैसे बुडविले व जमीन हडपण्याच्या प्रयत्नात आहे. मिल बंद असल्याने मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेकडे हायकोर्टाचा आदेश असून सुध्दा मार्च व एप्रिलचा पगार दिलेला नाही व २०२०-२१ चा बोनस सुध्दा दिलेला नाही. म्हणजेच मिल प्रशासन कोर्टाची अवहेलना करीत आहे. करीता आम्ही मिल मजुर झालेल्या अत्याचाराविरुध्द उपोषणाला बसण्यासाठी एस. डी. एम. हिंगणघाट येथे परवानगी मागितली आहे. आज आमच्या साखळी उपोषणाचा पाचवा दिवस असल्याचे प्रतिनिधीस मंजूरांनी सांगितले.

प्रशासन आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसून आम्हाला संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकाराचे हनन होत आहे. तरी संबंधीत अधिका-यावर मुलभुत हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच मिल प्रशासनाची आर्थिक गैरव्यवहाराबाबत चौकशी करून, ई.डी. चौकशीसाठी तक्रार दाखल करावी. अन्यथा उपोषणा दरम्यान मिल मजुराना जिवित वित्त व कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास त्यासाठी प्रशासन जबाबदार असेल असे प्रमुख मागण्यासह मिल मजदूर संघटनेनी सांगितले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ….अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; भार...

    January 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: भारतीय स्त्री शक्ती संस्थेने महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या...

    ज्ञानवापीचा इतिहास बदलवणे अशक्य; मोहन भागवत

    June 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: सरसंघचालक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज दि २ जून रोजी नागपुरात ज्ञानवापी ...

    नागपूर ठरतेय ‘क्राईम सिटी’; धक्कादायक बा...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याच्या उपरिजधानीत मागील काही महिन्यांपासून महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असताना नागपुरात...