1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

UP ELECTIONS I मुलायमसिंह यादव यांच्या जवळच्या व्यक्तीला भाजपने दिले तिकीट

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर: भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे जवळचे व्यक्ती हरिओम यादव (Hariom Yadav) यांना त्यांच्या सध्याच्या फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघातून तिकीट दिले आहे. हरी ओम यादव यांनी नुकताच समाजवादी पक्ष (एसपी) सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh Elections) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी भाजपने शुक्रवारी 85 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, ज्यामध्ये 30 ओबीसी, 19 एससी आणि 15 महिलांना तिकीट देण्यात आले आहे.

तीन वेळा आमदार राहिलेले हरि ओम यादव यांनी 12 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह राज्य भाजपचे प्रमुख स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सहा विधानसभा मतदारसंघात आपला प्रभाव असल्याचा हरिओमचा दावा आहे.

हरि ओम यादव (Hariom Yadav) यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘पक्षविरोधी वागणुकीमुळे’ सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली होती.

Claim Free Bets

हरिओम (Hariom Yadav) व्यतिरिक्त, यूपी निवडणुकीसाठी भाजपच्या (BJP) दुसऱ्या यादीत रायबरेली सदरच्या विद्यमान आमदार अदिती सिंह यांचाही समावेश आहे, ज्यांनी अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अदिती याआधी ज्या जागेवरून निवडणूक लढवली होती त्याच जागेवरून तिला रिंगणात उतरवण्यात आले आहे.

या यादीतील आणखी एक प्रमुख नाव म्हणजे माजी आयपीएस असीम अरुण, ज्यांनी पक्षात सामील होण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांना कन्नौज येथून तिकीट देण्यात आले आहे.

मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव ( नुकतेच भाजपमध्ये सामील झाल्या) यांनी लखनऊ कॅन्ट मतदारसंघातून तिकीट मागितले आहे. अपर्णाने 2017 च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत लखनौ कॅन्ट मतदारसंघातून निवडणूक लढवून राजकीय पदार्पण केले. मात्र, त्यांचा भाजपच्या (BJP) रिटा बहुगुणा जोशी यांनी पराभव केला.

उत्तर प्रदेशमध्ये 403 विधानसभा जागांसाठी 10 फेब्रुवारीपासून सात टप्प्यांत मतदान सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जो गोवा जिंकतो, तो दिल्ली जिंकतोच: काँग्रेस नेते चिद...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असल्याने देशातील राजकीय पक्षांनी आत्तापासूनच तयारी करण्यास सुरुवा...

    केद्रींयमंत्री नितीन गडकरींनी घेतली सुकदेव महाराजांच...

    July 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: अखिल भारतीय धर्म संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुकदेवजी महाराज यांनी केद्रींय मंत्री नितिनजी गडक...

    फ्लेचर पटेलचा समीर वानखेडेंशी काय संबंध?; नवाब मलिक

    October 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveफ्लेचर पटेल कोण आहे? फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा करत पुन्हा एकदा राष्...