नागपूर: यूपीएससी (UPSC) अंतिम निकालाची घोषणा झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते स्वतःचा निकाल ते upsc.gov.in या वेबसाइटवर बघू शकतात. यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या स्थानावर श्रुती शर्मा आणि दुसऱ्या सस्थानावर अंकिता अग्रवाल आहे. गामिनी सिंगला तिसऱ्या स्थानावर तर ऐशवर्य वर्मा चैथ्या स्थानावर आहे. यूपीएससी (UPSC) परीक्षेत अनेक विद्यार्थी बसतात त्यापैकी काही विद्यार्थ्यांना यश मिळते.
UPSC declares 2021 Civil Services Exam results
— ANI (@ANI) May 30, 2022
Shruti Sharma, Ankita Agarwal and Gamini Singla secure top three ranks, respectively pic.twitter.com/b0x9N0IomU
यूपीएससी (UPSC) २०२१ चे निकाल कसे बघा:
१) सगळ्यात पहिले UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा .
२) आता तुम्हाला होमपेजवर यूपीएससी सिविल सर्व्हिसेस रिझल्ट २०२१- अंतिम रिझल्ट ची लिंक दिसेल.
३) इकडे तुम्हाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसेल.
४) आता तुम्ही तुमचा निकाल बघू शकता तसेच त्याचे प्रिंट आऊट देखील घेऊ शकता.
यूपीएससी (UPSC) हि परीक्षा तीन स्तरात घेण्यात येते प्री,मेन, आणि मुलाखत आणि त्यानंतर निकाल घोषित करण्यात येतो. ज्यांना या परीक्षेत यश मिळते ते आईएएस , आयएफएस अधिकारी बनतात. महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडडळकर हि पहिली आली आहे. तिचा ऑल इंडिया रँक १३ आहे. आयोगाने १७ मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिल ते २६ मे २०२२ या काळात घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेतून नागरी सेवेतील ७१२ पदे भरण्यात येणार आहे.