1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

विश्वास नांगरे-पाटलांची समीर वानखेडे लाचखोरी प्रकरणात एन्ट्री

Spread the love

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाने बुधवारी चार तास चौकशी केल्यानंतर मुंबई पोलिसांनीही या लाचखोरी प्रकरणात मोठे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांनी समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केलेत. त्यामुळे आता या आदेशानुसार वानखेडेंवरील आरोपांची मुंबई पोलीस स्वतंत्रपणे चौकशी करणार आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी दिलीप सावंत या तपासाचे नेतृत्व करतील. या प्रकरणातील चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी हे आझाद मैदान, कुलाबा पोलीस स्थानकातील प्रत्येकी एक तसेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील एक व अन्य एक अधिकारी सायबर सेलमधील असणार आहे.

आम्ही समीर वानखेडेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या चारही तक्रारींचा एकत्रितपणे तपास करण्याचे ठरवले आहे. या चारही तक्रारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये कार्यरत असणाऱ्या समीर वानखेडेंविरोधात लाचखोरीच्या चार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. प्रभाकर साईल, सुधा द्विवेदी, कनिश्क जैन आणि नितीन देखमुख यांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जम्मू काश्मीरमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्य...

    December 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशोपियान भागात झालेल्या चकमकीत शस्त्रसाठाही हस्तगत जम्मू काश्मीरच्या शोपियान भागात आज सुरक्षा दलाच्या जवानां...

    गुजरातमध्ये पुन्हा 400 कोटीचे ड्रग्ज जप्त

    December 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुजरातमध्ये पाकीस्तानी बोटीतून वाहतूक करण्यात येणारे 77 किलो हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची...

    देशभरात 75 दिवस 75 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम...

    June 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्...