The Free Media

स्वतंत्र्यदिनाच्या दिवशी संभव्य हल्ल्याचा कट रचण्याचा डाव होता का?

thumbnail-wordpress

नागपूर: देशाची राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या दोनदिवस आधी जिवंत काडतुसांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामुळे स्वतंत्र्यदिनाच्या दिवशी संभव्य हल्ल्याचा कट रचण्याचा डाव होता का?

असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. या कारवाईदरम्यान दिल्ली पोलिसांनी २ हजार जिवंत काडतुसे जप्त केली असून, काडतुसांचा पुरवठा करणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पूर्व दिल्ली पोलिसांनी पुरवठादाराला आनंद विहार परिसरातून 2 बॅगांसह अटक केली असून, हे ही काडतुसं कुणाला पुरवणा होते तसेच याचा वापर नेमका कुठे केला जाणार होता याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

देशात 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जाणार असून, त्यासाठी मोठी जय्यत तयारी केली जात आहे. या विशेष महोतस्वासाठी देशभरात हर घर तिरंगा मोहीम देखील राबवली जाणार आहे. दरम्यान, या काळात देशात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या असून, सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणांना सजग राहण्याच्या सूचना देण्यात आला आहे.

या सोहळ्यासाठी दिल्लीत मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून, संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, आनंद विहार परिसरात दोन संशयितांकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशयिताची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2000 जिवंत काडतुसे असलेल्या दोन पिशव्या सापडल्या. यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्यासह अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरू आहे.

Share on Social media

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email

Related Post

Mark-Zukerberg

मार्क झुकरबर्गला सर्वात मोठा झटका

मुंबई: सोशल मिडीया नेटवर्कवर मेटाचा संस्थापक मार्क झुकरबर्गसाठी हे वर्ष कठीण ठरत आहे. तो आता जगातील 20 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. मेटा प्रमुख झुकरबर्ग

Read More »
cricket

नागपुरात क्रिकेट सामन्याच्या पाश्वभूमीवर देहव्यवसायासाठी आलेल्या दोन रशीयन तरूणींना अटक

नागपूर:आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर रशियातून नागपुरात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या दोन रशियन तरुणींना सदरमधील एका इंटरनॅशनल दर्जाच्या हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही

Read More »
Dussehra-gathering

दसरा मेळाव्यास कुणालाही परवानगी नाही

सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली_ मुंबई: शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाही परवानगी मिळणार नाही अशी माहिती समोर

Read More »

Latest News