1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सावरकरांच्या होणा-या अपमानावर आम्हाला बोलता आले नाही; मुख्यमंत्री शिंदे

Chief Minister Shinde-thefreemedia
Spread the love

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला त्यांनी भेट दिली. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. शिंदे यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले व तिथल्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, “हे सरकार स्थापन करताना आमचा एक अजेंडा बाळासाहेबांचे हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व असा आहे.

मागच्या सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीरांवर अनेक आक्षेपार्ह वक्तव्य होत होती. मात्र, त्यावेळी आम्हाला खुलेपणाने अगदी मनापासून आमचे मत व्यक्त करता येत नव्हते. आमची गळेचेपी होत होती. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आम्ही जो काही निर्णय घेतला त्यामधील एक कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर होणारी आक्षेपार्ह विधान हे देखील आहे.”

इतर धर्माचा तिरस्कार नाही

पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना ‘तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलात. यापुढे हे सरकार हिंदूंचे प्रश्नासाठी अधिक आक्रमक दिसेल का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “यापुढे आम्ही हिंदूत्वाबाबत आग्रही आणि आक्रमक असू आणि म्हणूनच मी आज इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. आमचे हिंदुत्व आहे बाळासाहेबांचे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व आहे. त्यांनी आम्हाला इतर कोणत्याही धर्माचा तिरस्कार अथवा त्यांचा अपमान करण्याची शिकवण दिलेली नाही.

Claim Free Bets

“हे हिंदूंचे सरकार”

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आता हे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदुत्व म्हणजे सर्वसामान्यांचा विकास, इथल्या जनतेचा विकास, त्यांचे प्रश्न सोडवणे, सर्व घटकांना न्याय देणार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. मी याआधी देखील म्हटले होते इथल्या प्रत्येकाला वाटले पाहिजे हे माझे सरकार आहे आपले सरकार आहे. आणि तशाच प्रकारचे काम हे सरकार करेल.” असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

 1. how to reach shri siddhivinayak temple

  Dedicated to the Hindu Lord Ganesh, the Siddhivinayak Temple in Mumbai is one of the famous and significant temples in India. Being such a famous attraction in Mumbai, it attracts a lot of devotees, and questions about how to reach Siddhivinayak Temple. So much so that devotees, who visit Mumbai do not leave the city without praying at the Siddhivinayak Temple. Not only this, it is also counted amongst the richest temples in the country as myriad Bollywood celebs and other affluent personalities come here and make huge offerings in cash and kind. The temple, which is located in Prabhadevi region, can be easily reached from all the corners of Mumbai.

  Avatar

  RAHUL PATIL

  All Posts

  Latest News

  Related Post

  View All

  संजय राऊतांना ईडी कोठडी; हे दोन नेते मांडणार पक्षाची...

  August 4th, 2022 | RAHUL PATIL

  Spread the loveमुंबई: महाराष्ट्राचा अपमान सातत्याने राज्यपाल भगतसिंग कोशारी करत आहेत. त्यांच्या विरोधात राज्यामध्ये मोठा अ...

  मनरो शाळेतील बांधकामावर कोर्टाकडून स्टे; चुकीच्या प्...

  October 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

  Spread the loveभंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) १८६५ साली बांधण्यात आली. प...

  Omicron Variant: 295 प्रवासी परदेशातून मुंबईला परतले...

  December 7th, 2021 | THE FREE MEDIA

  Spread the loveओमिक्रोन कोरोनाव्हायरसचा एक नवीन आणि धोकादायक प्रकार, संभाव्यपणे देशाला त्याच्या नियंत्रणाखाली घेत आहे. कोर...