1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यातील शाळा,कॉलेज सुरू करण्याबाबत काय म्हणाले,’अजित पवार’?

class12exams
Spread the love

देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात यावी, असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयं येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितला होतं. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जिल्ह्यांची कोरोनाची कोरोनाची स्थिती बघूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही लसींचे दोन्ही डोस घेऊन आपलं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावं असं आवाहनही अजित पवारांकडून करण्यात आलं आहे.

येत्या २ ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालयं टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं घेण्यात येऊ शकतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णय महत्त्वाचा असणार आहे. राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव किती आहे यावर शाळा आणि कॉलेजेस कधी सुरु होणार हे अवलंबून राहणार आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    संजय राऊत : तर वहिनीसाहेंबाचाही आग्रह आम्ही पाळू; ..

    March 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. ...

    पंजाबात राजकीय संकट; अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुजरात पाठोपाठ आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांन...

    पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आग...