1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कृषि कायदे २६ नोव्हेंबरपर्यंत मागे घ्या, अन्यथा…; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

Spread the love

एक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेले कृषि कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. मात्र, अद्याप या कायद्यांसंदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. याच दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत वादग्रस्त कृषि कायदे रद्द न केल्यास शेतकरी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असं राकेश टिकैत यांनी म्हटलंय.

टिकैत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले की, “केंद्र सरकारकडे २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत त्यांनी कृषि कायद्यांसदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा २७ नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावांतून ट्रॅक्टरने दिल्लीच्या सीमेवर तसेच आसपासच्या आंदोलनस्थळी पोहोचतील आणि भक्कम तटबंदी करतील.”

रविवारी प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राकेश टिकैत यांनी संताप व्यक्त केला होता. “प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाले आहे. जर त्यांनी तसे केले तर शेतकरी पोलीस स्टेशन, डीएम कार्यालयात तंबू लावतील. दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनातील वादाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांनी हा इशारा दिला आहे. जर पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना बळजबरी हटवले गेले तर आम्ही सरकारी कार्यालयांना धान्य बाजार बनवू”, असं राकेश टिकैत म्हणाले होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब नव्या पक्षाची करणार स्थापना

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love117 जागांवर उमेदवार उभे करणार पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज बुधवारी सकाळी 11 वाजता ...

    सिंहाला मागे टाकून वाघ कसा बनला राष्ट्रीय प्राणी?

    July 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ या खरे कारण नागपूर: आज आंतरराष्ट्रीय वाघ दिन आहे. ज्याला त्...

    देशातील कोरोनाची आकडेवारी देतेय; तिस-या लाटेची सूचना

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकाल दिवसभरात 22 हजार 431 रुग्णांची नोंद मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना प्रादुर्भावत काहीशा प्रमाणात ...