1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही’; मंदा म्हात्रेच्या या व्यक्तव्यावर चंद्रकात पाटलांची प्रतिक्रीया

manda mhatre
Spread the love

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप करत आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. मंदा म्हात्रे यांनी आपली ही खंत महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच एका कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करून सुद्धा पक्षाकडून डावलले जात असल्याचे म्हणत मंदा म्हात्रे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदा म्हात्रे यांच्या या नाराजीनानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागलेल्या असताना प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांना मंदा म्हात्रे यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले कि, मंदा म्हात्रे यांचे काय म्हणणे आहे, ते आम्ही ऐकून घेऊ. चंद्रकांत पाटील हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मंदा म्हात्रे भाजपबाबत नाराजी व्यक्त करताना म्हणाल्या कि, भाजपमध्ये महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट असल्याचे म्हटले गेले. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. त्यावेळी मोदींची लाट नव्हती ना? ते माझे काम आणि कर्तृत्व होते. पण महिलांनी केलेले काम झाकून टाकायचे, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत, असे अनेक प्रकार भाजपमध्ये होतात.

यावेळी शिवसेनेवर देखील चंद्रकांत पाटील यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाजपची ताकद आता वाढली असून भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन यापुढे सर्व निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढवेल. पण मोदींच्या नावावर ज्यांनी मते मागितली आणि आमचा विश्वासघात केला, अशा विश्वासघातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नसल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. त्याचसोबत, आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवून आणि जिंकून दाखवू, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदव...

    June 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई :- राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, महाराष्ट्राची जनता हे...

    गडचिरोलीत ट्रामा केअर रूग्णालयास तत्वत: मंजुरी

    May 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveगडचिरोली: विदर्भातील आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणा-या गडचिरोली जिल्हातील पोलींसावर त्वरीत उ...

    रूग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार; नितीन गडकरींची ...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी गाड्यांना भारतीय वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसविणार असल...