1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ; पीएवर छापा अन् 750 कोटींची मालमत्ता जप्त

Spread the love

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. येडीयुरप्पा यांचे स्वीय सहाय्यक एम. आर. उमेश यांच्या घरी आणि कार्यालवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यावेळी आयकर विभागाने कर्नाटकसह तीन राज्यांत घातलेल्या छाप्यामध्ये सुमारे 750 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे आता कर्नाटकच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीवनुसार, माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे निकटवर्तीय एम.आर. रमेश यांच्यासह 47 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत.

दरम्यान, महामार्ग आणि सिंचन प्रकल्पांची कंत्राटे घेणाऱ्या बंगळूरुस्थित तीन मोठ्या कंपन्यांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. 300 कर्मचाऱ्यांसह 7 ऑक्टोबरला आयकर विभागाने ही मोठी कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळूरुस्थित असलेल्या तीन बड्या कंपन्यांनी बोगस खरेदी, कामगार खर्च आणि बनावट उपकंत्राटे यांचा खर्च दाखवून उत्पन्न कमी दाखवले होते असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 750 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उघड झाली आहे. दरम्यान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे साहाय्यक उमेश हे शिमोगा जिल्ह्यातील आयनूरचे रहिवासी आहेत. तसेच सुरुवातीला उमेश बीएमटीसीमध्ये चालक म्हणून काम करत होते. यलहंका येथील पुट्टेनहळ्ळीच्या बीएमटीसी डेपोमध्ये उमेश नोकरी करत होते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘पंडित नेहरु इतिहासात महत्वपूर्ण होते, वर्तमान...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहात्मा गांधी यांनी पंडित नेहरु यांना देशाचा नेता म्हणून निवडले हे योग्यच होतं हे सरदार पटेल यांनी स्वातंत्...

    “पीएम केअर फंडमध्ये जमा झालेला पैसा कुठे जातोय...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमाजी न्यायमूर्तीं लोकूर यांनी व्यक्त केली चिंता पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती ना...

    आंध्र प्रदेश-ओडिशामध्ये वादळाचा इशारा, या शहरांमध्ये...

    December 4th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveओडिशा आणि आंध्रप्रदेश येथे वादळ ‘जवाद’ ने चांगलाच जोर पकडला आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट सा...