1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र नाही’; गिरीश महाजन

Girish-Mahajan -thefreemedia
Spread the love

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. जळगावमधील जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या अटकेनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संजय राऊत यांच्यावर तत्काळ कारवाई झालेली नाहीये. तक्रार आली आणि कारवाई झाली, असे झालेले नाही.

बहुचर्चित पत्राचाळ प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती. त्यांना अनेकदा समन्स आले, चौकशीला बोलावले. पण, त्यांनी सहकार्य केले नाही. म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली. ईडी सहजासहजी, अशी कारवाई करीत नाही किंवा अटक करीत नाही. संजय राऊत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आहात. स्वतःला तुम्ही काय समजता, जरा अंतर्मुख होऊन विचार करा.

आता लोकांना भावनिक आवाहन करून काहीही उपयोग नाही. काहीही आरोप करण्यात अर्थ नाही. नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनाही संधी देण्यात आली होती. तशीच संधी संजय राऊतांनाही दिली गेली. पण, त्यांनी टाळाटाळ केली. ईडीने सखोल चौकशी करूनच त्यांना अटक केली आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय. हा विरोधकांचा आरोप चुकीचा, विरोधकांना असे बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही महाजन म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    परिवहन मंत्री अनिल परब गोत्यात; अडचणीत वाढ

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांना केलेल्या फोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकारानंत...

    समुद्रपूर नगर पचांयतीच्या पाच उमेदवारांचे भवितव्य उद...

    January 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: समुद्रपूर तालुक्यातील नगर पंचायतीच्या सर्व प्रभागातील म्हणजे १ ते १७ वार्डातील निवडणुका मागील टप्प्य...

    विजय वडेट्टीवारांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या...