नागपूर : WhatsApp लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने तीन नवीन फिचर आणले आहे. यामुळे तुम्हाला तुमची प्रायव्हसी अधिक जपता येणार आहे. WhatsAppने आणलेले नवीन फिचर खालीलप्रमाणे a:
१)तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे सेलेक्टेड युझर्स पाहू शकतात :-
व्हॉट्सअँपचे हे नवे फिचर या महिन्यात येऊ शकते. यामध्ये तुम्ही तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे सेलेक्टेड युझर्स पाहू शकणार आहेत. तुम्ही व्हॉट्सअँपमध्ये ‘ऑनलाइन’ स्टेटस इंडिकेटर सेट करु शकता. तुम्ही ऑनलाइन आहात की नाही? हे तुम्ही निवडलेल्या युझर्सलाच कळेल.
२) सायलेंटली करु शकता ग्रुप लेफ्ट :-
जर एखाद्या ग्रुपमधून तुम्हाला लेफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही सायलेंटली ग्रुप लेफ्ट करु शकता. या फिचरमध्ये तुम्ही जर ग्रुप लेफ्ट केला तर ते इतरांना कळणार नाही. “you left the group” असा मेसेज ग्रुप सोडल्यावर येणार नाही.
३) मेसेजचा स्क्रीनशॉट घेण्यावर निर्बंध :-
व्हॉट्सअँपच्या “WhatsApp व्यू वन्स” या मेसेजचा स्क्रीनशॉट आता युझर्स घेऊ शकणार नाहीत. WhatsApp व्हू वन्स मेसेज तुम्ही एकदाच पाहू शकता. आता स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे नवे फिचर व्हॉट्सअँप लाँच करणार आहे. या फिचर नुसार तुम्ही स्क्रीनशॉट ब्लॉक हा पर्याय निवडू शकता. यामुळे युझर कोणत्याही WhatsApp व्हू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही.