1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO

110 countries recognise India’s Covishield, Covaxin

Spread the love

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील कोराडी आणि खापरखेडा थर्मल पॉवरमुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. या प्रकल्पांमुळं हवा, पाणी आणि माती प्रदूषित होत असल्याचा धक्कादायक अहवाल बाहेर आला आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मंथन अध्ययन केंद्र आणि असर संस्थेनं याबद्दल सर्वे केला होता.

महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) कोराडी (२४०० मेगावॅट) आणि खापरखेडा (१३४० मेगावॅट) प्रकल्पांच्या भोवतालच्या प्रदेशात प्रदूषण होत आहे. भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल हे मर्क्युरी, आर्सेनिक, ॲल्युमिनिअम, लिथिअम इत्यादीसारख्या विषारी धातूंनी दूषित झाले. फ्लाय ॲशमुळे व्यापक स्तरावर हवा, पाणी आणि माती दूषित झाल्याचे अभ्यासातून दिसून आले.

पोल्युटेड पॉवर : हाऊ कोराडी ॲण्ड खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन्स आर इम्पॅक्टिंग द एन्व्हायरन्मेन्ट, या शीर्षकाखाली हा अभ्यास करण्यात आला. दोन्ही विद्युत निर्मिती केंद्रे आणि ॲश पॉण्डमधून होणारा प्रदूषक घटकांचा विसर्ग तातडी थांबविणे गरजेचे आहे. स्थानिक प्रतिनिधी, नागरी संस्था सदस्य आणि स्वतंत्र तज्ज्ञांच्या समितीच्या निरीक्षणाखाली प्रदूषणामुळे झालेले दुष्परिणाम दूर करावे, असे हा अभ्यास सुचवतो.

यंत्रणा समस्या सोडविण्यात अपयशी

दोन्ही विद्युत निर्मिती प्रकल्प आणि ॲश पॉण्डसारख्या प्रकल्पाशी संबंधित पायाभूत रचनांमुळे या भागात दीर्घ काळापासून प्रदूषणाच्या नोंदी आहेत. अधिकृत यंत्रणा या समस्या सोडवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरली असल्यानं हा अभ्यास करण्यात आल्याचे सीएफएसडीच्या संचालक लीना बुद्धे म्हणाल्या.

Claim Free Bets

केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने कोराडी प्रकल्पास दोन नवीन युनिटसह (प्रत्येकी ६६० मेगावॅट) विस्तारीकरणासाठी पर्यावरणीय आकलन करण्यासाठी असलेले मुद्दे दिले आहेत, अशी माहिती लीना बुद्धे यांनी दिली. यामुळे प्रदूषण आणखी वाढणार असून ही चिंतेची बाब आहे, असे बुद्धे यांनी सांगितले.

  THE FREE MEDIA

  THE FREE MEDIA

  All Posts

  Related Post

  View All

  Anand Mahindra backs Agnipath scheme, says will prov...

  June 20th, 2022 | DRISHTI SHARMA

  Spread the loveNagpur: Amid the rising protests across the country against the Centre’s new military scheme- Agnipath, ind...

  What’s concealed? Mob services suspended, high-ranke...

  April 30th, 2022 | NISHA HIRANI

  Spread the loveNagpur: On April 30, the Punjab government announced that mobile internet services in the Patiala district ...

  ED being used to ‘harass’ opposition par...

  August 4th, 2022 | THE FREE MEDIA

  Spread the loveThe Congress on Wednesday alleged that the Enforcement Directorate has become a “tool” in the h...