1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

Google One VPN, iOS वापरकर्त्यांकरिता येणार …. !

Spread the love

नागपूर: Google One ने iOS (iOS users) वापरकर्त्यांसाठी स्वतःचे VPN (Virtual Private Network) आणण्यास सुरुवात केली आहे. अँड्रॉइड ( Android) वापरकर्त्यांसाठी ही सेवा एक वर्षाहून जास्त कालावधीपासून उपलब्ध आहे. पण आता आयफोन वापरकर्ते देखील याचा वापर करू शकतील. ज्याप्रकारे अँड्रॉईडवर (Android) हे कार्य करते त्याचप्रमाणे, iOS वरील वापरकर्त्यांना देखील Google One VPN वापरण्यास सक्षम होण्यासाठी गुगल वन प्रीमियम सब्स्क्रिप्शन मेम्बरशिप प्लान (Google One Premium membership plan) असणे आवश्यक असेल.

Google One VPN ही Google ची स्वतःची VPN सेवा आहे जी टेक जायंट प्रीमियम सह सेवा देते. Google चे VPN देखील इंटरनेट ऑफ सिक्योर थिंग्ज अलायन्स (Internet of Secure Things Alliance) (IoXt) द्वारे प्रमाणित आहे. हि गुगलची सेवा फक्त निवडक प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आता यूएस, कॅनडा आणि यूकेसह 18 देशांचा समावेश आहे.

भारत या यादीत नाही आणि तुमचा प्रीमियम प्लॅन असला तरीही सध्या Google VPN येथे समर्थित नाही. तसेच, Google ने ही सेवा अधिक क्षेत्रांमध्ये आणण्याची योजना आखली आहे जेणेकरून ते भारतात लाँच करू शकतील. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे कि, Google VPN चा वापर करण्याकरिता, तुम्हाला 2 टीबी गुगल वन प्रीमियम मेम्बरशिप किंवा जास्त क्लाऊड स्टोरेज ची आवश्यकता असेल. तुमचे VPN तसेच स्टोरेज ५ मेंबर वापरू शकतात.

Claim Free Bets

Google One VPN ने 3 नवीन फिचर अँड्रॉईड वापरकर्त्यांकरीता आणले आहे:-
Google One ने तीन नवीन फिचर अँड्रॉईड वापरकर्त्यांकरीता आणले आहे. पहिले म्हणजे ‘सेफ डिस्ककनेक्ट’ यामुळे VPN ऍक्टिव्ह असेल तेव्हाच यूझर् ला वेब वापरण्याचा ऍक्सेस मिळेल.

दुसरे म्हणजे अँप बायपास (App Bypass), जे निवडक अँप्सला VPN ऐवजी तुमचे स्टॅंडर्ड कनेक्शन वापरू देतो.

तिसरे म्हणजे Snooze याचे वैशिष्ट्य तुम्हाला काही काळासाठी सेवा तात्पुरते बंद करू देते.v

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जिओची प्रणव मिस्त्री यांच्या AR Experience स्टार्टअप...

    February 5th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: जिओ ब्रँडच्या अंतर्गत येणारे जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platforms) -डिजिटल सर्व्हिस यांनी $ 15 दशलक्ष सिलि...

    जेपी मॉर्गन मेटाव्हर्समध्ये पाऊल ठेवणारी पहिली बँक

    February 16th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: जेपी मॉर्गन, यू.एस. मधील सर्वात मोठी बँक, ने सांगितले की, ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आभासी जग, ड...

    Oppo ने Reliance Jio च्या सहकार्याने 5G ची केली चाचणी

    February 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने शुक्रवारी जाहीर केले की त्यांनी रिलायन्स जिओच्या सहकार्या...