नागपूर: भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. ही मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे.
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरावर तिरंगा लावावा असं आवाहन केलं आहे. ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस आणि रेशनच्या दुकानात सुद्धा हा तिरंगा मिळणार आहे. शिवाय तुम्ही ऑनलाईन (bit.ly/3QhgK3r) सुद्धा राष्ट्रध्वज मागवू शकता.
भारतात तिरंगा फडकावण्यासंबंधीचे सर्व नियम ध्वज संहिता 2002 अंतर्गत करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय प्रतीक अपमान विरोधी कायदा १९७१ च पालन कराव लागत. अलीकडच्या काळात या संहितेत दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. ते म्हणजे आता पॉलिस्टरच्या कापडाचा देखील ध्वज तयार करायाला परवानगी आहे. याआधी कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी होती. तर २० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारनेण्यासार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावत येईल. याआधी राष्ट्रद्वाज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकवण्याची परवानगी होती.
राष्ट्रध्वज फडकावितांना पाळा ‘हे’ महत्वाचे नियम :-
- ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तिरंगा अशा पद्धतीने लावायचा की तो खाली पडणार नाही.
- भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये.
- कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.
- ध्वज फडकावताना नारिंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी.
- ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये.
- ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.
- ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं गरज असल्यास ठेवता येतील.
- राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा.
- कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये.
- जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.
तिरंग्याचा सन्मान राखायचा हि सगळ्यात मोठी जवाबदारी आहे.तिरंगा कुठेही टाकून द्यायचा नाही.
१५ ऑगस्ट रोजी सूर्यास्त झाला कि राष्ट्रध्वज निट कढून घरात ठेवायचा.तुमच्या घरी ध्वज फडकावण्याचा विचार करत असाल तर हे नियम नक्की लक्षात घ्यावेत.
हर घर तिरंगा प्रमाणपत्र http://www.harghartiranga.com या अधिकृत
वेबसाईट वरून डाऊनलोड करता येईल.
harghartiranga.com
Har Ghar Tiranga
Har Hath Tiranga: Let’s unite through Tiranga