1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशाबाहेर अफगाणी नागरिकांना जाता येणार नाही

zabibullah mujahid
Spread the love

संपूर्ण जगभरासाठी सध्या अफगाणिस्तान येथील परिस्थिती चिंतेचा विषय ठरली आहे. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता अफगाणिस्तानचे भविष्य काय? असा प्रश्न जगापुढे आहे. अशातच दररोज वेगवेगळे आदेश, फतवे काढत तालिबानी आहेत. त्यावरुन या प्रश्नाची गंभीरता अधोरेखित होत आहे. तालिबान्यांनी नुकतीच एक नवी घोषणा दिली आहे.

मंगळवारी एक पत्रकार परिषद तालिबान्यांनी घेतली. यावेळी बोलताना तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने सांगितले की, अफगाण नागरिकांना यापुढे आता देशाबाहेर जाता येणार नाही. बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी विमाने जिथे उतरत आहेत, त्या काबूल विमानतळावर आता अफगाण नागरिकांना जाता येणार नाही.

सीएनएनने याबद्दल दिलेल्या बातमीमध्ये सांगितले आहे की, अफगाण नागरिकांसाठी या विमानतळाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. पण ह्या रस्त्याने इतर देशातील नागरिक जाऊ शकतात आणि आपापल्या देशाच्या विमानांनी आपल्या देशातही जाऊ शकतात, अशी माहिती तालिबान्यांकडून देण्यात आली. अफगाण नागरिक बाहेर जाऊ लागल्याने आम्हीही नाखूश आहोत. येथील डॉक्टरांनी तसेच शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासकांनी देश सोडून जाऊ नये. त्यांनी येथेच राहून आपापल्या क्षेत्रात काम करावे, असे तालिबानने सांगितले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तालिबानी वापरणार अमेरिकेनी सोडलेली शस्त्रास्त्रे?

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकाबूल विमानतळावरून आज अमेरिकेच्या सैन्याने काढता पाय घेतला. अशाप्रकारे अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपली उपस्थ...

    इस्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर!

    March 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइस्रायलच्या पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ” पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताला पहिली अध...

    रशियाच्या युद्ध घोषणेने शेअर बाजारात हाहाकार

    February 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली. याच...