1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

फ्लेचर पटेलचा समीर वानखेडेंशी काय संबंध?; नवाब मलिक

nawab malik
Spread the love

फ्लेचर पटेल कोण आहे? फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा करत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीला लक्ष केले आहे. मलिक यांनी ट्वीट केले असून त्यांच्या या ट्वीट मुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मनिष भानुशाली याने मी खबरी असल्याचे सांगितले. गोसावी हा फरार आरोपी आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत 2 तारखेच्या आधी आपण त्यांना ओळखत नव्हतो असे सांगितले. स्वतंत्र पंच असल्याचे एनसीबीने सांगितले असून मी त्याबाबतीत आज प्रश्न उपस्थित करत असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.

एनसीबीने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. कोणतीही केस उभी करायची असते तेव्हा ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ठीत नागरिक, आजुबाजूची लोक यांना बोलवून पंचनामा करणं कायदेशीर तरतूद असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.

गेल्या एक वर्षातील माहिती घेतली असता एनसीबीने तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचे नाव आहे. याचा अर्थ स्वतंत्र पंच यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    एस सोमनाथ यांची इस्रोचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती

    January 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveतिरुअनंतपुरम : मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) बुधवारी एस सोमनाथ यांना तीन कार्यकाळासाठी अवकाश विभ...

    “बुल्ली बाई”, “सुल्ली डील्स”...

    March 29th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: दिल्ली न्यायालयाने सोमवारी ‘बुल्ली बाई’ अँप प्रकरणातील आरोपी निरज बिश्नोई आणि ‘सु...

    अयोध्येतून निघाली रामायण एक्स्प्रेस

    November 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या भक्तांसाठी रामायण एक्प्रेसचा प्रवास सुरु झाला आहे. दिल्लीच्या सफदरज...