1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दुबई एक्सपोमध्ये दाखविण्यात येणार ६ चित्रपट, एक मराठी वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा – अमित देशमुख

amit deshmukh2
Spread the love

दुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान सहा चित्रपट, एक मराठी वेबसिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दुबई एक्सपोमध्ये दाखविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

दुबईच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 18 ते 23 दरम्यान दुबई एक्सपोचे आयोजन केले आहे. या एक्स्पोसाठी महाराष्ट्रातून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे सहभागी झाले आहेत.

देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचे सांसकृतिक वैभव (संगीत, नाटक, लोककला, सिनेमा, सांस्कृतिक परंपरा) याची झलक या एक्स्पोमध्ये दाखविण्यात येईल. कडू गोड, तक तक, ताजमहल, बारडो, गोष्ट एका पैठणीची, गोदाकाठ असे ६ चित्रपट, वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा यावेळी दाखविण्यात येणार असून यामध्ये २० लोककलाकार सहभागी होणार आहेत.

या एक्सपोदरम्यान महाराष्ट्रामध्ये चित्रीकरणासाठी एक खिडकी योजनेद्वारे काय सुविधा देण्यात येतात, महाराष्ट्रात चित्रीकरण कसे चालते, येणाऱ्या काळात नेमक्या काय सुविधा असणार आहेत याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या गोलमेज चर्चासत्रात देणार आहेत. दुबई एक्स्पो गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार होता, परंतु कोविड या जागतिक महामारीमुळे हा एक्स्पो गेल्या वर्षी आयोजित ना करता यावर्षी आयोजित करण्यात आला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इडा चक्रीवादळाने धडक दिल्यानंतर न्यूयॉर्क शहरासाठी आ...

    September 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveरेल्वेने प्रवास करणाऱ्यांकरिता एक आनंदवार्ता आहे. न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती न...

    अफगाणिस्तान पुन्हा हादरले, काबूलमध्ये मोठा स्फोट

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानची राजधानी काबुल पुन्हा मोठ्या स्फोटाने हादरले आहे. शहरातील सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर...

    चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; विमानांची उडाणे रद्द, शाळ...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताने एकीकडे १०० कोटींच्या लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असून त्याचा आनंद सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. ...