1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वर्धा जिल्ह्यातील कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडे आढळल्याने उडाली खळबळ

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

आर्वी – अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडे वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडे आणि कवट्या पाठवली आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

आर्वीतील डॉ. रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये ४ दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तक्रार झाल्यावर हा बेकायदेशीर गर्भपात ३० हजार रूपये घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरसह तिघांना अटक केली. पोलिसांनी बुधवारी (१२ जानेवारी) हॉस्पिटल परिसरात तपासणी केली. यावेळी रूग्णालयाच्या परिसरात एका खड्डयात ११ कवटया आणि ५२ हाडे आढळून आली. पोलिसांनी हे अवशेष ताब्यात घेऊन नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

सध्या पोलीस कवटया आणि हाडे नेमके कुणाचे आहेत याबद्दल तपास करत आहेत. अटकेत असलेल्या डॉ. रेखा कदम यांचीही कसून चौकशी सुरू आहे. या हॉस्पिटलला अधिकृत गर्भपात व गर्भनिदान केंद्राचा दर्जा आहे. पण, मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याची वैद्यकीय पध्दत असते. या दवाखान्यात ती पाळली की नाही याबाबत पोलीस साशंक आहेत. आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळूंके म्हणाले की सापडलेल्या अवशेषाबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच ठोस निष्कर्ष काढता येईल.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    निर्वाण फाउंडेशन, नाशिकतर्फे “इंटरनॅशनल आयडॉल ...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनिर्वाण फाउंडेशन, नाशिकच्या वतीने देण्यात येणारा “इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड-2021” श्रीमती माधुरी प...

    उपग्रहाच्या अवशेषाच्या तपासणीसाठी चंद्रपुरात येणार &...

    April 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveचंद्रपूर: शहरासह सिंदेवाही तालुक्यात उल्कापातासारखी दिसणारी रोषणाई आकाशात दिसून आली असली तरी आता या वेगाने ...

    उत्खननात अजून एक कवटी फोरेन्सिक पथकाच्या हाती

    January 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआतापर्यंत १२ कवट्या हस्तगत नागपूर: आर्वीच्या कदम हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी चेंबरच्या...