1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरातील २२ वर्षीय स्वप्नील चोपकर या तरुणाने टाकाऊ वस्तूंपासून बनवली स्पोर्ट्स कार

Spread the love

नागपूर: नागपुरातील २२ वर्षीय स्वप्नील चोपकर या तरुणाने टाकाऊ वस्तूंपासून एक स्पोर्ट्स कार बनवली आहे त्याला F1 असे नाव देण्यात आले आहे. लहानपणापासूनच स्वप्नीलला गाड्यांबद्दल आकर्षण त्याला होते. स्वप्नील सध्या एम.कॉम चे शिक्षण घेत आहे. गाडी बनवायचे कोणतेही शिक्षण किंवा त्या विषयी कोणतीही पदवी नसतांना रेसिंग प्लॅटफॉर्म वर चालणारी गाडी स्वप्नीलने बनविली आहे.

हि F1 नावाची कार बनवायला त्याने भंगारमधून कारला लागणाऱ्या वस्तू वापरल्या आहे. जसे लोवर आर्म, स्टिअरिंग रॅक, व्हील,व्हील कॅप , ब्रेक ऑइल, सीट, इंजिन, एअर फिल्टर, पेट्रोल टॅंक इत्यादी. नवीन वस्तू मध्ये गिअर बॉक्स माउंटिंग, इंजिन माउंटिंग हेच नवीन वापरण्यात आले आहे. पण या कारमध्ये लागणारे जास्तीत जास्त पार्ट हे टाकाऊ वापरले आहे.

कोरोना काळात कॉलेज बंद असल्याने स्वप्नील गॅरेजमध्ये काम करायचा त्यावेळेस त्याने गाड्यांचे काम शिकले.

हि F1 नावाची कार बनवायला कार मारुती कारचे ८०० सीसीचे कार्बोरेटर वापरले आहे. कार बनविताना त्याला अनेक समस्या येत होत्या. इंजिन व्यवस्थित रित्या बसत होते पण त्यानंतर गाडी डाव्या बाजूने जात होती, काही कारणांमुळे गाडी आवाज देखील करत होती. ब्रेक पाईप सडलेले होते. ऑइल लीक होत होते. परिस्थिती हलाखाची असल्यामुळे त्याला कारकरीता लागणारे नवीन पार्टस तो घेऊ शकला नाही.

या गाडीमध्ये चार गियर आहे. या कारचे इंजिन उलटे लावण्यात आले आहे. याचे मॅन्युअल गिअर पण उलटे लागतात. पहिल्या गियर मध्ये गाडी ५०-६० गतीने चालते दुसरा गियर टाकल्यावर गाडी ९० च्या गतीने चालते, असे स्वप्नीलने सांगितले.

Claim Free Bets

स्वप्नीलचे पुढचे प्रोजेक्ट कॉन्व्हर्टिबल कारचे आहे. आता स्वप्नील अशी कार बनवत आहे कि त्याला स्पोर्टी लुक मिळेल तसेच ती पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही वर चालेल. तसच गाडीला लागणाऱ्या बॅटरीची समस्या सोडविण्याचा मागे देखील तो काम करत असल्याचे स्वप्नीलने The Free Media ला सांगितले

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    यूपीएससी निकालात मुलींची बाजी

    May 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल ऑनलाइन उपलब्ध आहे...

    नागपूरच्या जेनिफर वर्गीस व नाशिकच्या कुशल चोपडाला वि...

    July 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveप्रथम महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा ‘नांदेड’ महाराष्ट्र २०२२ नागपूर :- नांदेड येथ...

    आदिवासी आश्रम शाळा इमारतीच्या उभारणीकरीता शासकीय निध...

    January 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveसमृद्धी महामार्ग हा मंगरूळ चव्हाळा येथे असलेली आदिवासी आश्रम शाळा, त्या शाळेला पाण्याचा पुरवठा करणारी विहीर...