1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गृहमंत्री अमित शहा,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अरविंद केजरीवाल यांचे १६व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

Shah-amit-thefreemedia
Spread the love

नागपूर: देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी आज १८ जुलै रोजी मतदान होत आहे. २१ जूनला देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहे. सध्याची राजकीय स्थिती बघता द्रौपदी मुर्मू यांचे पारडे राष्ट्रपती पदासाठी जड दिसून येत आहे. त्यांच्या पारडे जड असून त्यांच्या देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कारकीर्द संपणार असून येत्या २१ तारखेला देशामध्ये नवीन राष्ट्रपतींची निवड होणार आहे. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणत्याही व्यक्तीची राष्ट्रपती पदासाठी निवड झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्टपती होण्याचा बहुमान मिळावा अशी मागणी केली जात आहे. विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाकरिता उमेदवार आहेत.

कशी होणार राष्ट्रपती पदाकरिता निवडणूक?

  • इलेकट्रोरल कोलेजच्या माध्यमातून राष्टपतीची निवड होणार.
  • लोकसभा आणि राज्यसभा खासदार यामध्ये मतदान करतात.
  • राज्यातील तसेच दिल्ली आणि पॉंडिचेरीतील विधासभेतील निवडून आलेले सदस्य यामध्ये मतदान करतील.
  • नामनिर्देशित सदस्यांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नाही.
    लोकसभा खासदार -५४३, राज्यसभा खासदार-२३३, देशातील आमदारांची संख्या- ४,०३३

राष्ट्रपती पदासाठी एकूण मतदार – ४,८०९

Claim Free Bets

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मतदान केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले.

भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे खासदार मनमोहन सिंग यांनी संसदेत भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.

आजच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देत आहे.

आमचा विश्वास आहे की राष्ट्रपती निवडणूक कोणत्याही राजकीय निवडणुकीपेक्षा वेगळी असते. हे सर्वोच्च पद आहे आणि योग्य उमेदवाराला मत दिले पाहिजे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला: आदित्य ठाकरे

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ….आणि ‘हेमा’ झाली गानकोकीळा लता मं...

    February 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveगानकोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर विश्वातील सुप्रसिध्द गायिका असून त्यांना विसरणे शक्य नाही. गायिका ...

    माजी क्रिकेटपटू इम्रान खानची बीसीसीआयवर आगपाखड

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबीसीसीआय जागतिक क्रिकेटवर इतके वर्चस्व गाजवत आहे की त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणताही देश जाणार नाही. मात्...

    भाजप नेते म्हणतात; पेट्रोल २०० रुपये लिटर झाल्यानंतर...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसध्या देशात इंधन दरवाढ हा ज्वलंत विषय असून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढत आहेत. मागील २० दिवसांमध्ये तब्बल...