1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांसह कर्मचा-यांची पदे तातडीने भरावीत

doctors
Spread the love

चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या कालावधीत पूर्ण करा तसेच शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत अशी मागणी इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.

चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय बांधकामाच्या समस्यांबाबत मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, दूरदृश्यप्रणालीव्दारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यासह एचएससीसी या कंपनीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सुविधा उत्कृष्टरित्या मिळावी यासाठी शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत, जेवढ बांधकाम पूर्ण झाले आहे त्यामध्ये विद्युतीकरण व पाणीपुरवठा ही सुरळीत करण्यात यावा व पूर्ण झालेल्या इमारती शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात.

Claim Free Bets

शासकीय महाविद्यालयाचा पाण्याचा प्रश्नदेखील तातडीने सोडवावा. वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाकरिता पूर्णवेळ अधिष्ठाता पदाची भरती व्हावी, हाफकीनकडून जी औषधे खरेदी केली जातात त्याबाबतच्या नियमावलीमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या मर्यादेत पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लवकरच वर्ग एक व वर्ग दोनची पदभरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    १५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

    August 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेवेंंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता कधी होणार? असा प्...

    अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलो...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमु्ंबईत एमएमआरडीएने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेशमधील भविष्यातील ...

    दिवाळी नंतर कोरोनाची तिसरी लाट; आरोग्यमंत्री

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआपल्या राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट गेलेले नाही. दसरा, दिवाळीनं...