1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ज्या लावारीस संजयला बाप नाही माहित नाही त्यास काय किंमत द्यायची’; नितेश राणेची बोचरी टिका

Nitesh Rane
Spread the love

खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत सलग दोन दिवसांपासून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधत आहेत. अग्रलेखातून राणेंवर टीका करत राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, याबद्दल फडणवीसांच्या मनातही शंका नाही, असं म्हणत राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान राऊतांनी अग्रलेखातून केलेल्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘ज्या लावारीस संजयला आपला बाप माहीत नाही त्याला काय किंमत द्यायची, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण मुख्यमंत्री ठाकरेच्या मिठाला जागतो. आणि पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे. स्व माँ साहेबांबद्दल याच नालायकाने काय लिहिलं होतं हे लोकप्रभामध्ये वाचावं, असा टोला त्यांनी लगावलाय. तसेच ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची, असं नितेश राणे म्हणालेत.

दरम्यान, मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात आणि जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे ‘महान’ हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी, अशी टीका राऊतांनी अग्रलेखातून केली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘राणी लक्ष्मीबाई’ योजनेंतर्गत ‘हे&...

    June 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: देशभरासहित राज्यातही केंद्र आणि राज्य सरकारद्वारे विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना प्रोत्साहन दे...

    ईडीने सील केलेल्या डी.एस.कुलकर्णी यांच्या बंगल्यातून...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गेल्या ४ वर्षांपासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्र...

    “हिंमत असेल तर…” विनायक राऊतांचे राणेंना थेट आ...

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबि...