1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात दर्गा परिसरात गर्दीचा लोट

tajbag
Spread the love

राज्यात सर्वत्र सध्या कोरोनाचा काळ आहे. दुसरी लाट ओसरली असे वाटत असले तरी, गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कालच पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३ दिवसात कडक निर्बंध लावण्याचे सुतोवाच केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरात उरूस निमित्त प्रचंड गर्दीचा लोट पहायला मिळत आहे. ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्याच्या बाहेर, रस्त्यावर, मोकळ्या जागेत जत्रेसारखी दुकाने लागली आहेत. हजारो भाविक इथे नियमांचे उल्लंघन करून जमाव करताहेत.

ताजबाग परिसर येथील मोठा ताजबाग दर्गा परिसराच्या बाहेरील भागात उरुससाठी आलेल्या मुस्लिम भाविकांची प्रचंड गर्दीचा एक व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नागपूर उमरेड रोडवरील ताजबाग परिसरातील ताजुद्दिन बाबांच्या दर्गाच्या बाहेर, रस्त्यावर आणि मोकळ्या जागेत छोट्या छोट्या दुकाने लागल्याचे आणि तिथे प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे.

मोठा ताजबाग परिसरात दरवर्षी ताजुद्दीन बाबांचा उरूस पार पडतो. मात्र यंदा कोरोना निर्बंधांमुळे ताजबाग ट्रस्टने उरूस आयोजित केलेले नाही. तरीही त्या ठिकाणी जत्रा सदृश्य दुकाने लागल्या आणि नागपूरसह आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने तिथे पोहोचले आहेत.

Claim Free Bets

दरम्यान, एका बाजूला नागपुरात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धार्मिक स्थळावर नियमांचे उल्लंघन करून उसळणारी अशी गर्दी कोरोनाचा संकट आणखी वाढवणार नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपूरतील भ्रष्टाचारास बसणार चाप, ‘फाईल ट्रॅकर...

    September 3rd, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveसरकारी काम आणि महिनाभर थांब, असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांचा आहे. कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात वि...

    पुण्यात व्यापाऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’; दुपारी 3 वाज...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या म...

    हिंगणघाट जळीत हत्याकांडाचा ‘आज’ निर्णय

    February 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: वर्धा जिल्ह्यातील बहुचर्चित हिंगणघाट तालुक्यात घडलेल्या जळीतकांड प्रकरणात प्रतीक्षेत असलेला निकाल आज...