1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर भावना गवळी ईडीच्या चौकशीला हजर?

bhavana gawli
Spread the love

शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने 4 ऑक्टोबर म्हणजेच आज उपस्थित राहण्याचं समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला होता. खासदार गवळी आज ईडी चौकशीला हजर राहणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

भावना गवळी यांना 28 सप्टेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या समन्स नुसार भावना गवळी यांना आज 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भावना गवळी यांना आज 11 वाजता ईडी कार्यलयात हजर रहायचं होतं. भावना गवळी आज ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर होतात की हजर राहण्यासाठी वेळ मागतात हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. ईडीचं समन्स आल्यानंतर भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उपचारासाठी नारायण राणे लिलावती रूग्णालयात

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रु...

    शिक्षकांना अर्जित रजेचे रोखीकरण मिळण्यासाठी प्रयत्न ...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिक्षक आमदार विक्रम काळे यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासन नागपूर: शालेय शिक्षण विभागाचा जीआर असूनही...

    दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचे नाव

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजकारणात सध्या एकमेकांबद्दलचा आदर, सन्मान, मोठेपणा हे शब्द परावलीचे झाले आहेत. सध्या एकमेकांवरची चिखलफेक ए...