1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चीनी भाषेमुळे सुंदर पिचाईनी लावला गुगल ट्रान्सलेटचा शोध

Sundar-Pichai
Spread the love

गरज ही नवीन शोधाची जननी असते असे म्हटले जाते. भारतीय वंशाचे आणि अल्फाबेट या नामवंत सोफ्टवेअर कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबाबतीत हे वाक्य फारच लागू पडते. गुगल मॅप तयार करण्यासाठी त्यांना पत्नीबरोबर झालेल्या वादावादीतून प्रेरणा मिळाली होती तसेच गुगल ट्रान्सलेट साठी कारण ठरली चीनी भाषा. गुगलचे हे महत्वपूर्ण टूल दररोज सरासरी सुमारे ३ कोटी ४ लाख युजर्स कडून सर्च केले जाते आणि गेल्या १२ महिन्यात हा आकडा आणखी वाढला आहे.

जगभरातील १०८ भाषांचा अनुवाद चुटकी करण्याची सवलत देणारे हे टूल सुंदर पिचाई यांचीच देणगी आहे. एप्रिल २००६ मध्ये हे टूल सादर केले गेले त्यापूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने पिचाई चीन मध्ये होते. दिवसभर मिटींग्स असल्या तरी त्यांच्या मदतीला दुभाषा होता. पण जेव्हा ते एकटेच हॉटेल, टॅक्सी, दुकानात जायचे तेव्हा चीनी भाषा त्यांच्यासाठी चांगलाच अडथळा ठरत होती. चीन मध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या मुळात कमी त्यात अश्या सार्वजनिक ठिकाणी तर फक्त चीनीच बोलली जाते. आपण संवाद साधू शकत नाही यामुळे पिचाई वैतागले आणि त्यातून या शानदार टूलची कल्पना त्यांना सुचली.

चीनमध्ये बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रत्येकाला हीच अडचण येत असणार असे लक्षात आल्यावर पिचाई यांनी ही समस्या समूळ सोडवायचा ध्यास घेतला. एखादी कल्पना डोक्यात आली की ती वास्तवात येईपर्यंत विश्रांती नाही हा त्यांचा स्वभाव. त्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेत आपल्या मुख्यालयात फोन करून २५ सोफ्टवेअर इंजिनीअर्सना चीन मध्ये बोलावून घेतले आणि अनुवाद करणारे टूल कसे तयार करायचे याचे धोरण ठरविले. कामाला सुरवात झाली आणि २००६ मध्ये हे टूल अस्तित्वात आले. त्यावेळी फक्त दुसऱ्या भाषांचे इंग्रजी अनुवाद होत असत पण आता १०८ भाषांचे कोणत्याही भाषेत अनुवाद होऊ शकतात.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ट्विटरच्या संचालक मंडळावर एलोन मस्कची वर्णी

    April 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर मध्ये टेस्ला संस्थापक एलोन मस्क यांनी मोठा हिस्सा खरेदी केल्याचा खुलासा झाल्य...

    Google Play Store दुर्लक्षित अँप्स hide करण्याची योज...

    April 8th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Apple ने 2017 मध्ये 32-बिट अँप चे समर्थन करणे बंद केले. Play Store अँप्ससाठी Google च्या आगामी आवश्...

    इंस्टाग्रामने आणले नवीन फिचर! लगेच अपडेट करा इंस्टाग...

    February 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये एन्गेगिंगचा एक नवीन मार्ग सादर करत आहे. फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्...