1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चीनी भाषेमुळे सुंदर पिचाईनी लावला गुगल ट्रान्सलेटचा शोध

Sundar-Pichai
Spread the love

गरज ही नवीन शोधाची जननी असते असे म्हटले जाते. भारतीय वंशाचे आणि अल्फाबेट या नामवंत सोफ्टवेअर कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबाबतीत हे वाक्य फारच लागू पडते. गुगल मॅप तयार करण्यासाठी त्यांना पत्नीबरोबर झालेल्या वादावादीतून प्रेरणा मिळाली होती तसेच गुगल ट्रान्सलेट साठी कारण ठरली चीनी भाषा. गुगलचे हे महत्वपूर्ण टूल दररोज सरासरी सुमारे ३ कोटी ४ लाख युजर्स कडून सर्च केले जाते आणि गेल्या १२ महिन्यात हा आकडा आणखी वाढला आहे.

जगभरातील १०८ भाषांचा अनुवाद चुटकी करण्याची सवलत देणारे हे टूल सुंदर पिचाई यांचीच देणगी आहे. एप्रिल २००६ मध्ये हे टूल सादर केले गेले त्यापूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने पिचाई चीन मध्ये होते. दिवसभर मिटींग्स असल्या तरी त्यांच्या मदतीला दुभाषा होता. पण जेव्हा ते एकटेच हॉटेल, टॅक्सी, दुकानात जायचे तेव्हा चीनी भाषा त्यांच्यासाठी चांगलाच अडथळा ठरत होती. चीन मध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या मुळात कमी त्यात अश्या सार्वजनिक ठिकाणी तर फक्त चीनीच बोलली जाते. आपण संवाद साधू शकत नाही यामुळे पिचाई वैतागले आणि त्यातून या शानदार टूलची कल्पना त्यांना सुचली.

चीनमध्ये बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रत्येकाला हीच अडचण येत असणार असे लक्षात आल्यावर पिचाई यांनी ही समस्या समूळ सोडवायचा ध्यास घेतला. एखादी कल्पना डोक्यात आली की ती वास्तवात येईपर्यंत विश्रांती नाही हा त्यांचा स्वभाव. त्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेत आपल्या मुख्यालयात फोन करून २५ सोफ्टवेअर इंजिनीअर्सना चीन मध्ये बोलावून घेतले आणि अनुवाद करणारे टूल कसे तयार करायचे याचे धोरण ठरविले. कामाला सुरवात झाली आणि २००६ मध्ये हे टूल अस्तित्वात आले. त्यावेळी फक्त दुसऱ्या भाषांचे इंग्रजी अनुवाद होत असत पण आता १०८ भाषांचे कोणत्याही भाषेत अनुवाद होऊ शकतात.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इलेक्ट्रिक वाहनांना का लागते आग याचा झाला खुलासा

    May 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवाहन उत्पादकांच्या वाढू शकतात अडचणी देशात इलेक्ट्रिक वाहने येण्यापूर्वीच वाहनांना आग लागण्याच्या घटना समोर ...

    Infosys CEO सलील पारेख यांचे मानधन FY22 मध्ये 43% वा...

    May 26th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Infosys NSE 1.22% मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांची एकूण भरपाई 2021-22 या आर्थिक वर्षात 43% ...

    आता तुमच्या सात बारा उता-यावर असणार ‘क्यूआर को...

    July 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveफसवणूकीपासून होणार कायमची सुटका मुंबई: राज्यातील शेतकऱ्याच्या जमिनीची सारी कुंडली सात-बारा उताऱ्यावर असते. ...