1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तरंगत्या दगडात बांधले गेलेय हे ८०० वर्षे जुने मंदिर

temple built in floating stone
Spread the love

भारताची ओळख मंदिराचा देश अशीही आहे. देशात अशीही अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी म्हणून ओळखली जातात. ही यादीही भली मोठी आहे. त्यातील एक प्रसिद्ध मंदिर तेलंगणाच्या वारंगळ येथे असून हे मंदिर शिवाला समर्पित आहे. हे मंदिर तरंगणाऱ्या दगडातून बनविले गेले आहे. हे शिवमंदिर रामाप्पा मंदिर नावाने प्रसिद्ध असून मंदिराला हे नाव मंदिर बांधणारे शिल्पकार रामाप्पा याच्यावरून दिले गेले आहे.

१२ व्या शतकात काकतीय वंशाचा राजा गणपती देवा याने १२१३ मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरु केले आणि ते पूर्ण होण्यास ४० वर्षे लागली. या काळातील अनेक मंदिरे आज भग्नावस्थेत आहेत मात्र रामाप्पा मंदिर अनेक नैसर्गिक आघात सोसूनसुद्धा आजही चांगल्या स्थितीत आहे. हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत कसे याचे संशोधन वैज्ञानिकांनी केले पण काही उलगडा झाला नाही तेव्हा त्यांनी मंदिरात वापरल्या गेलेल्या दगडाचे परीक्षण केले. हे दगड अतिशय हलके आहेत आणि त्यांचे तुकडे पाण्यात तरंगतात असे यातून दिसून आले.

हे मंदिर सहा फुट उंचीच्या जोत्यावर बांधले गेले असून मंदिराच्या भिंतीवर रामायण महाभारतातील प्रसंग कोरले गेले आहेत. हे सर्व काम अतिशय सुबक आणि सुंदर आहे. मंदिरात ९ फुट उंचीचा नंदी आहे. राजा गणपती देवा शिल्पकार रामाप्पा याच्या कामावर इतका खुश झाला होता की त्यानेच या मंदिराचे नाव रामाप्पा मंदिर असे ठेवल्याचे सांगितले जाते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    धक्कादायक…! वर्धेत हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून जाळले

    August 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: महात्मा गांधी यांच्या जिल्ह्यात सदैव मोठमोठे गुन्हे घडतच असतात. परंतु या गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्ष...

    ‘मेरी प्यारी जिंदगी’- दारूच्या महामारीची जाणीव करून ...

    October 13th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveजागतिक आरोग्याच्या अभ्यासानुसार, १५ ते ४९ वयोगटामधील मृत्यूच्या कारणांमध्ये दारूचे सेवन हे एक प्रमुख कारण आ...

    लखीमपूर खेरामधील शेतकर्‍यांची हत्‍या ह...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलखीमपूर खेरामधील शेतकर्‍यांची हत्‍या पूर्वनियोजित कटच होता. हा शेतकर्‍यांचा अवमान आहे....