1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

माजी क्रिकेटपटू इम्रान खानची बीसीसीआयवर आगपाखड

imran khan
Spread the love

बीसीसीआय जागतिक क्रिकेटवर इतके वर्चस्व गाजवत आहे की त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणताही देश जाणार नाही. मात्र, त्यांच्या याच वर्चस्ववादी वृत्तीमुळे क्रिकेटचे नुकसान होत आहे, अशा शब्दात पाकिस्तानचे माजी कर्णधार व सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बीसीसीआयवर आगपाखड केली आहे.

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. ते जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवतात. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्या पाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. पण भारताविरुद्ध असे करण्याचे धाडस कोणाकडेही नाही, असेही ते म्हणाले. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीज राजा यांनीही बीसीसीआयवर टीका केली होती.

बीसीसीआयने आयसीसीचा निधी रोखला तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाला कुलूप लागेल, असे मत व्यक्त केले होते आता त्यात इम्रान यांनीही समर्थन देत टीका केली आहे. पैसा सर्वात महत्त्वाचा आहे. बीसीसीआय सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. त्यामुळे कोणताही देश भारताविरोधात पाऊल उचलण्याचे धाडस करणार नाही, जे इंग्लंडने पाकिस्तानसोबत केले. केवळ खेळाडूच नव्हे तर विविध देशांच्या क्रिकेट मंडळाला बीसीसीआयकडून पैसे मिळतात. यामुळे बीसीसीआय जागतिक क्रिकेटवर पूर्णपणे नियंत्रण ठेवत आहे, असेही इम्रान म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बिपिन रावत यांच्या जागी नरवणे यांची नियुक्ती होणार ?

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveCDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. आता लष्कर प्रमुख मनोज नरवणे सीडीएस होण्याची शक्यता ...

    इथेनॉल आधारित वाहन उद्योगाला चालना देण्याचा केंद्र ...

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. भारतात तर पेट्रोलच्या प्रति लिट...

    SC likely to set up technical committee to probe Peg...

    September 23rd, 2021 | DRISHTI SHARMA

    Spread the loveNagpur: The Supreme Court on Thursday said that it is setting up a technical expert committee to inquire in...