1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“का व कशी”? साजरी करतात ‘कोजागिरी’ पौर्णीमा

Spread the love

चला जाणून घेऊ या ‘आजच्या’ दिवसाचे महत्त्व

कोजागिरी…. हू जागिरी’….म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करुन मस्त बेत आखला जातो. इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे. मस्त मसाला दूध, सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल पण कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्व आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला ‘शरद पौर्णिमा’, ‘माणिकेथारी’, ‘नवान्न पौर्णिमा’ , कौमुदी पौर्णिमा, ‘माडी पौर्णिमा’ असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेऊ या.

कोजागिरी पौर्णीमेचे महत्त्त्व

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिले जाते.  प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेेच्या आधी नऊ दिवसाची नवरात्र आलेली असते. या नऊ दिवसात शक्ति आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवगेळ्या रुपांची मनोभावे पूजा करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो.

कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे.  दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. 

Claim Free Bets

कोजागिरी पौर्णिमा तारीख आणि वेळ

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व जाणून घेतल्यानंतर ती कधी येते हे जाणून घेऊ. कोजागिरी पौर्णिमा ही दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा म्हणजेच 2021 मध्ये ही कोजागिरी पौर्णिमा आज 19 ऑक्टोबर रोजी आली आहे. पौर्णिमेचा प्रारंभ हा सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी सुरु होणार आहे. पूर्ण चंद्र आल्यानंतर तुम्ही चंद्रासमोर मसाला दूध ठेवून त्याचे सेवन केले जाते. लक्ष्मी

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यसरकार विरोधात एफआरपी मुद्यांवर आंदोलन करणार; सद...

    September 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशेतकऱ्याना कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याने याविरोधात राज्य सरकरांकडूनही काहीच कारवाई होत नस...

    केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज धुळे दौ-यावर

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. रा...

    बोलणं बंद करा, काय केलं ते सांगा’; वाहन कंपनी ...

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveवाहन उद्योगातील दिग्गज असलेल्या मारुती सुझुकीचे प्रमुख आर.सी. भार्गव आणि टीव्हीएस मोटरचे प्रमुख वेणू श्रीनि...