1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

एलन मस्क फाऊंडेशनच्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने जिंकला तब्बल 1 कोटी 85 लाख रुपयांचा पुरस्कार

thumbnail-thefreemedia
Spread the love

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी एलन मस्क फाऊंडेशनकडून XPRIZE कार्बन रिमूव्हल माइलस्टोनसाठी घेतलेल्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्रीनाथ अय्यर आणि त्याच्या टीमला अडीच लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 1 कोटी 85 लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर 195 संघांपैकी, दहा देशातील 23 विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. काल ही घोषणा ग्लासगो येथे सुरु असलेल्या COP-26 मधील सस्टेनेबल इनोव्हेशन फोरम या कार्यक्रमात करण्यात आली आहे. दरम्यान, मागील 4 वर्षांपासून मस्क फाऊंडेशन आणि एक्सप्राइजकडून हा पुरस्कार जगातील कार्बन नष्ट करण्याबाबत संशोधन करणाऱ्यांना दिला जात असतो.

आयआयटीच्या श्रीनाथ अय्यर (पीएचडी विद्यार्थी), अन्वेषा बॅनर्जी (पीएचडी विद्यार्थी), सृष्टी भामरे (बीटेक + एमटेक) आणि शुभम कुमार (ज्युनियर रिसर्च फेलो-अर्थ सायन्स) हा भारतातील एकमेव संघ असून ज्यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. दरम्यान प्राध्यापक अर्णब दत्ता म्हणाले की, पृथ्वीच्या तापमानात सुमारे 1.1 अंश सेल्सिअस वाढ औद्योगिकीकरणानंतर CO2 पातळीत वाढ झाली आहे. यात योगदान देणारी काही प्रमुख क्षेत्रे म्हणजे ऊर्जा, पेट्रोलियम, पोलाद, खते आणि सिमेंट उद्योग. आमच्या संकल्पनेमुळे विद्यमान उद्योगांमध्ये CO2 उत्सर्जन त्याच्या स्रोतावर मर्यादित ठेवण्यासाठी समाविष्ट केली जाऊ शकते.

संस्थेतील पृथ्वी विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय कार्यक्रम इन क्लायमेट स्टडीज विभागाचे प्राध्यापक विक्रम विशाल यांनी सांगितले की, कार्बन डाय ऑक्साईडला त्याच्या स्त्रोतावर (उद्योगांमध्ये) कॅप्चर करणे आणि नंतर भविष्यातील वापरासह कार्बोनेट क्षारांमध्ये रूपांतरित करण्याबाबतच्या आमच्या शोधामुळे पुन्हा एकदा ते वायू CO2 म्हणून वातावरणात प्रवेश करू नये अशी व्यवस्था केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तिसरी लाट लक्षात घेता आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन...

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाची तिसरी लाट 15 ऑक्टोबरपर्यंत डोकं वर काढू शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा ...

    क्रांती रेडकरांच्या बहिणीवर गुन्हा नोंदविल्याप्रकरणी...

    November 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआर्यन खानच्या अटकेपासून मुंबईत सुरू झालेले ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ...

    SC ने महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभराचे...

    January 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी(२८...