1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नोटीस खोट्या गुन्ह्या अंतर्गत असली तरी चौकशीला हजार राहणार

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. फडणवीसांनी भांडाफोड केलेल्या ठाकरे सरकारच्या बदली घोटाळ्या संदर्भात दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी कारण्यासाठी ही नोटीस बाजवण्यात आली आहे. पण आपण या चौकशीला उपस्थित राहून सहकार्य करणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले फडणवीस?
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी नवाब मालिकांच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आज १२ मार्च असून १९९३ साली आजच्याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. तीन दशकं झाली तरी बॉम्बस्फोटांच्या जखमा कायम आहेत. मी या स्फोटांमध्ये शहिद झालेल्यांना श्रद्धांजली वाहतो, पण त्याचवेळी बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे लोक जेलमध्ये जाऊनही राज्याच्या मंत्रिमंडळात कायम आहेत याची खंत असल्याचे फडणवीस म्हणाले.

मार्च २०२१ मध्ये मी महाविकास आघाडी सरकारचा पोलिसांच्या बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता. त्याचे ट्रान्सक्रिप्ट, आणि सर्व माहिती भारताच्या होम सेक्रेटरींना सादर केली. त्यानंतर त्याचे गांभीर्य ओळखून माननीय न्यायालयाने त्याचा सर्व तपास आणि चौकशी सीबीआयला सुपूर्त केली आहे. यातल्या अनेक महत्वपूर्ण बाबी आता समोर येते आहेत.

Claim Free Bets

पण जेव्हा हा तपास सीसीबीआयला गेला तेव्हा ठाकरे सरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला. ऑफिसर्स सिक्रेट ऍक्ट अंतर्गत गोपनीय माहिती उघड केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मला पोलिसांनी एक प्रश्नावली पाठवली. मी त्यांना सांगितले की ही प्रश्नावली भरून पाठवेन. खरं तर विरोधी पक्ष नेता म्हणून मला हे विशेष अधिकार आहेत की माझी माहितीचे स्रोत मी उघड करणे आवश्यक नाही. पण तरी मला वारंवार प्रश्नावली पाठवण्यात आली. कोर्टात असे सांगण्यात आले की मी प्रश्नावली पाठवूनही उत्तर देत नाही.

वास्तविक मी या प्रकरणाची कोणतीही माहिती उघड केलेली नाही. ती थेट गृहसचिवांना दिली आहे. उलट ही गोपनीय माहिती मंत्र्यांनीच पत्रकार परिषद घेत उघड केली. पण मला या प्रकरणात बीकेसी सायबर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मी या चौकशीला हजर राहणार असून पोलिसांच्या तपासाला सहकार्य करणार आहे. सीआरपीसी कायद्याच्या कलाम १६० अंतर्गत ही नोटीस पाठवली आहे. मी गृहमंत्री राहिलो असल्यामुळे मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे खोट्या गुन्ह्या अंतर्गत ही नोटीस असली तरीही मी चौकशीला हजर राहणार आहे. मला खात्री आहे की सीबीआय यात दूध का दूध और पानी का पानी करेल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मंत्र्यापेक्षा पेंग्विन पॉवरफुल! १५ कोटी रुपये पेंग्...

    December 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआमची मानसिकता किती भिकारी असावी विधानसभेत मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विनचा मुद्दा उपस्थित भाजप आमदार स...

    नवाब मलिक यांना घेता येणार खासगी रुग्णालयात उपचार

    May 14th, 2022 | THE FREE MEDIA

    Spread the loveराज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला नसला तरी त्यांना खासगी र...

    आर्यन खानला मोठा धक्का; न्यायालयाबरोबर तुरुंगामधील अ...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveक्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत असून आर्थर रोड ...