1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानसह १२ नेते अडकले, न्यायालयाने दिला हा आदेश…….

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर: आर्थिक रसातळाला गेलेल्‍या श्रीलंकेमधील तणाव पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्‍यानंतरही कायम आहे. आता राष्‍ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा देण्‍यास नकार दिला आहे.

दरम्‍यान, पंतप्रधान राजपक्षे यांच्‍यासह १२ अन्‍य नेत्‍यांना देश सोडून जाण्‍यास न्‍यायालयाने बंदी घातली आहे. दरम्‍यान, राष्‍ट्रपती गोटबाया यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत विरोधी पक्षांबरोबर चर्चा करणार असल्‍याचे ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट केले आहे.

गोटबाया यांनी देशातील अशांती संपविण्‍यासाठी सुचवले चार पर्याय
श्रीलंकेचे राष्‍ट्रपती गोटबाया यांनी चार ट्‍विट करत देशात अशांती संपविण्‍यासाठी पर्याय सुचवले आहे. त्‍यांनी म्‍हटलं आहे की, देशात नवीन सरकार स्‍थापन करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. सरकार स्‍थापन झाल्‍यास देश अराजकतेच्‍या गर्तेत जाणार नाही. भविष्‍यातील रणनीती ठरविण्‍यासाठी ठोस उपाययोजना करणे शक्‍य होईल. त्‍याचबरोबर पंतप्रधानही नियुक्‍त केले जातील.

Claim Free Bets

नवीन सरकारला देशाच्‍या पुढील वाटचालीसाठी नवीन योजना आखण्‍यासाठी वेळ दिला जाईल. घटनादुरुस्‍ती करुन देशाला आणखी मजबूत केले जाईल. विरोधी पक्षांच्‍या मागणीनुसार लवकर विरोधी पक्षांबरोबर बैठक घेतली जाईल, असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या मालमत्ता वाचविण्‍यासाठी आणि देशाला वाचविण्‍यासाठी जीवनावश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा होणे गरजेचे आहे. देशाची अर्थव्‍यवस्‍था पूर्वपदावर आणण्‍यासाठी सर्वांचे सहकार्याची गरज आहे, असेही त्‍यांनी ट्‍विट केले.

महिंदा राजपक्षेंना अटक करा : विरोधी पक्षांची मागणी
श्रीलंका आजवरच्‍या भयंकर आर्थिक संकटातून जात आहे. देशातील परिस्‍थिती हाताळण्‍यास राजपक्षे यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशभरात पंतप्रधान राजपक्षे यांच्‍या विरोधात देशभरात आंदोलन होत आहे. त्‍यांना तत्‍काळ अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. महिंदा राजपक्षे हे २००५ ते २०१५ या काळात देशाचे राष्‍ट्रपती होते. याच काळात त्‍यांनी लिबरेशन टायगर्स ऑफ ममिल ईलमच्‍या दहशवादी संघटनेविरोधात जोरदार लष्‍करी मोहिम राबवली होती. यानंतर देशातील लोकप्रिय नेता अशी त्‍यांची ओळख बनली होती.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कॉमनवेल्थ गेम्स कसे सुरु झाले ?

    August 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान सुमारे 200 भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये 16 वेगवेगळ्या खेळांम...

    Sri Lanka Presidential Election: रानिल विक्रमसिंघे आ...

    July 20th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: रानिल विक्रमसिंघे आता श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती राहतील. पोस्टल बॅलेटने झालेल्या वोटिंगमध्ये १३४ खा...

    शहिद सैनिकांसाठी अर्ध्यावर उतरविला अमेरिकेचा राष्ट्र...

    August 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्थान मधील काबुल विमानतळाबाहेर गुरुवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान ७२ मृत्यू झाले असून त्यात १३ ...