1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारताची अभूतपूर्व कामगिरी; प्रथमच थॉमस कपवर उमटवली मोहोर

Thomas Cup-thefreemedia
Spread the love

इंडोनेशिया: भारताने ऐतिहासिक व अभूतपूर्व कामगिरी करत थॉमस कपच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करून इतिहास रचला. आणि थॉमस कपवर आपली मोहोर उमटविली. भारताने ही स्पर्धा 14 वेळा जिंकलेल्या संघाचा पराभव केला आहे. लक्ष्य सेन पहिल्या आणि सात्विक चिरागच्या जोडीने दुसऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. यानंतर किदाम्बी श्रीकांतने तिसरा सामना जिंकून भारतीय संघाला प्रथमच थॉमस कपचा चॅम्पियन बनवले.

थॉमस कपच्या 73 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघ चॅम्पियन बनला आहे. ही स्पर्धा 1949 पासून खेळवली जात होती, परंतु आतापर्यंत इंडोनेशिया, चीन, डेन्मार्क आणि मलेशिया या संघांचे या स्पर्धेत वर्चस्व होते, जे भारताने संपवले आहे. ही स्पर्धा जिंकणारा भारत हा सहावा संघ आहे.

मलेशिया आणि डेन्मार्कसारख्या बलाढ्य संघांना हरवून भारतीय संघाने प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. भारताला या स्पर्धेत फक्त एकच सामना गमवावा लागला होता, जेव्हा त्याला गट स्टेजमध्ये चायनीज तैपेईकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी इंडोनेशियाचा संघ अंतिम फेरीपूर्वी या स्पर्धेत अजिंक्य ठरला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.

लक्ष्य सेनने सलामीच्या लढतीत गतविजेत्या इंडोनेशियाच्या अँटोनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यातही सात्विक चिरागच्या जोडीने 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात श्रीकांतने क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा पराभव करत इतिहास रचला.

Claim Free Bets

श्रीकांतने क्रिस्टीचा पराभव केला
भारताच्या किदाम्बी श्रीकांतने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीवर शानदार विजय नोंदवला. श्रीकांतने पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकला आणि दुसरा गेम 23-21 ने जिंकला. श्रीकांत या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. भारताने पहिले तीन सामने जिंकले होते, त्यामुळे उर्वरित दोन सामने खेळण्याची गरज नव्हती.

दुसऱ्या सामन्यात सात्विक-चिराग जोडीने बाजी मारली

दुसऱ्या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना केविन संजय आणि मोहम्मद अहसान यांच्याशी झाला. इंडोनेशियन जोडीने पहिला सेट 21-18 असा जिंकला, तर भारतीय जोडीने दुसरा सेट 23-21 असा जिंकला. यानंतर तिसरा सेटही सात्विक-चिराग जोडीने 21-19 असा जिंकून भारताला सामन्यात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

पहिला सामना: लक्ष्यने आपल्या नावावर विजय मिळवला

लक्ष्य आणि अँथनी सिनिसुका यांच्यातील सामना अतिशय रोमांचक झाला. अँथनीने पहिला सेट 21-8 असा जिंकला. त्याचवेळी लक्ष्यने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत 21-17 असा विजय मिळवला. लक्ष्यने तिसरा सेट २१-१६ असा जिंकून सामना जिंकला

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेट म...

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमाझा २३ वर्षाचा क्रिकेट प्रवास संस्मरणीय; हरभजन सिंग आपल्या भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंग याने आंतरराष्...

    दिल्लीशी नरीमन पॉईंट जोडणार; गडकरींचं स्वप्न

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील नरीमन पॉंईंटपासून ते थेट दिल्लीपर्यंत सागरी सेतू बांधण्याचे माझे स्वप्न आहे. तसेच मुंबईतील सी लिंक...

    ‘वीर सावरकरांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच ...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या स...