The Free Media

Thomas Cup-thefreemedia

इंडोनेशिया: भारताने ऐतिहासिक व अभूतपूर्व कामगिरी करत थॉमस कपच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करून इतिहास रचला. आणि थॉमस कपवर आपली मोहोर उमटविली. भारताने ही स्पर्धा 14 वेळा जिंकलेल्या संघाचा पराभव केला आहे. लक्ष्य सेन पहिल्या आणि सात्विक चिरागच्या जोडीने दुसऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. यानंतर किदाम्बी श्रीकांतने तिसरा सामना जिंकून भारतीय संघाला प्रथमच थॉमस कपचा चॅम्पियन बनवले.

थॉमस कपच्या 73 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघ चॅम्पियन बनला आहे. ही स्पर्धा 1949 पासून खेळवली जात होती, परंतु आतापर्यंत इंडोनेशिया, चीन, डेन्मार्क आणि मलेशिया या संघांचे या स्पर्धेत वर्चस्व होते, जे भारताने संपवले आहे. ही स्पर्धा जिंकणारा भारत हा सहावा संघ आहे.

मलेशिया आणि डेन्मार्कसारख्या बलाढ्य संघांना हरवून भारतीय संघाने प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. भारताला या स्पर्धेत फक्त एकच सामना गमवावा लागला होता, जेव्हा त्याला गट स्टेजमध्ये चायनीज तैपेईकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचवेळी इंडोनेशियाचा संघ अंतिम फेरीपूर्वी या स्पर्धेत अजिंक्य ठरला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.

लक्ष्य सेनने सलामीच्या लढतीत गतविजेत्या इंडोनेशियाच्या अँटोनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यातही सात्विक चिरागच्या जोडीने 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात श्रीकांतने क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा पराभव करत इतिहास रचला.

श्रीकांतने क्रिस्टीचा पराभव केला
भारताच्या किदाम्बी श्रीकांतने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीवर शानदार विजय नोंदवला. श्रीकांतने पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकला आणि दुसरा गेम 23-21 ने जिंकला. श्रीकांत या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. भारताने पहिले तीन सामने जिंकले होते, त्यामुळे उर्वरित दोन सामने खेळण्याची गरज नव्हती.

दुसऱ्या सामन्यात सात्विक-चिराग जोडीने बाजी मारली

दुसऱ्या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना केविन संजय आणि मोहम्मद अहसान यांच्याशी झाला. इंडोनेशियन जोडीने पहिला सेट 21-18 असा जिंकला, तर भारतीय जोडीने दुसरा सेट 23-21 असा जिंकला. यानंतर तिसरा सेटही सात्विक-चिराग जोडीने 21-19 असा जिंकून भारताला सामन्यात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

पहिला सामना: लक्ष्यने आपल्या नावावर विजय मिळवला

लक्ष्य आणि अँथनी सिनिसुका यांच्यातील सामना अतिशय रोमांचक झाला. अँथनीने पहिला सेट 21-8 असा जिंकला. त्याचवेळी लक्ष्यने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत 21-17 असा विजय मिळवला. लक्ष्यने तिसरा सेट २१-१६ असा जिंकून सामना जिंकला

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

Tata Steel-thefreemedia

टाटा स्टील (Tata Steel) 4 वर्षांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर 1,200 कोटी रुपये खर्च करणार

नागपूर:Tata Steel Ltd ने पुढील तीन ते चार वर्षात नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. स्टील च नव्हे तर इतर साहित्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नाचा

Read More »
uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »

Latest News