1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ईडीला अटक, जप्ती आणि तपासाचा अधिकार आहे काय?

court-order-thefreemedia
Spread the love

सुप्रीम कोर्टाचा आज मोठा फैसला

नवी दिल्ली : देशभरात छापे, जप्ती आणि अटकसत्र सुरू करणाऱ्या ईडीच्या अधिकारांवर आज, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ईडीला अटक करण्याचा आणि जप्त करण्याचा अधिकार आहे की नाही? याबाबत न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी.टी. रवी कुमार यांच्या खंडपीठ निर्णय देणार आहे.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीच्या अटक, जप्ती आणि तपास प्रक्रियेला विविध याचिकांमध्ये आव्हान देण्यात आले आहे. त्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय मोठा निकाल देणार असल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

एमएलए कायद्यातील तरतुदी मूलभूत अधिकार

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आणि महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकांसह तब्बल २४२ याचिकांवर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. पीएमएलए अंतर्गत गुन्ह्यांचा शोध, अटक, जप्ती, तपास आणि खटला चालवण्यासंदर्भात ईडीकडे उपलब्ध असलेल्या व्यापक अधिकारांना याचिकांमध्ये आव्हान देण्यात आले आहे. पीएमएलए कायद्यातील तरतुदी मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतात, असे याचिकांमध्ये म्हटले आहे. त्यावर कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

Claim Free Bets

युक्तिवाद

वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि मुकुल रोहतगी आदींनी सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या अधिकारक्षेत्राबाबत युक्तिवाद केला. जामीन अटी जाचक अटी, अटकेची कारणे न सांगणे, मनी लाँड्रिंगची व्यापक व्याख्या आणि खटल्याच्यावेळी पुरावा म्हणून गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी केलेल्या कथनाची ग्राह्यता असा युक्तिवाद केला.

ईडीच्या कारवाईचे भवितव्य

दुसरीकडे, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा बचाव केला होता. घोटाळेबाज विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे १८ हजार कोटी रुपये बँकांना परत करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

पीएमएलए कायद्यांतर्गत ६७ हजार कोटी रुपयांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता केंद्राच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी पीएमएलए कायद्यातील वादग्रस्त तरतुदींचे समर्थन केले. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय घेते ? यावर ईडीच्या कारवाईचे भवितव्य अवलंबून असेल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    द्रौपदी मुर्मू भारताच्या वाईट तत्वज्ञानाचे प्रतिनिधि...

    July 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: काँग्रेस नेता आणि प्रवक्ता अजय कुमार यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. त्यांनी म्हटले कि एनडी...

    अयोध्यायेतील जमीन घोटाळ्याच्या मुद्यावरून शिवसेनेची ...

    December 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप आणि शिवसेनेमधील हिंदुत्वाच्या मुद्यावरून सुरु असलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेने भाजपवर अयोध्...

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला लता दिनानाथ मंगेशकर ...

    April 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी ...