1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

काश्मिरी पंडित समुदायाचे काश्मीरमध्ये पुनर्वसन

Kashmiri-Pandit-thefreemedia '
Spread the love

नवी दिल्‍ली: जम्मू-काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या विकास पॅकेजअंतर्गत काम करणाऱ्या एकाही काश्मिरी पंडिताने काश्मीर खोऱ्यात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या निषेधार्थ अलीकडच्या काळात राजीनामा दिलेला नाही.

केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर यंत्रणा, दिवसा आणि रात्रीच्या वेळी परिसराची निगराणी, दहशतवाद्यांच्या विरोधात सक्रीय कारवाई , नाक्यांवर अहोरात्र तपासणी, काश्मिरी पंडितांची निवास स्थाने असलेल्या विभागात गस्त तसेच दहशतवादी हल्ले परतवून लावण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सुरक्षा दलांचे जवान तैनात करणे अशा अनेक उपाययोजनांचा समावेश आहे.

पंतप्रधानांच्या विकास पॅकेजअंतर्गत 5502 काश्मिरी स्थलांतरितांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात, जम्मू-काश्मीर सरकारच्या विविध विभागांमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या किंवा भविष्यात तिथे नोकरी करणाऱ्या काश्मिरी स्थलांतरीत कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी केंद्र सरकारने 6000 संक्रमण निवासस्थानांच्या उभारणीला मंजुरी देखील दिली आहे. तसेच, काश्मिरी स्थलांतरितांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने 7 सप्टेंबर 2021 रोजी नवे पोर्टल देखील सुरु केले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लो...

    July 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत...

    ‘राष्ट्रपतींच्या हस्ते गायक मदन चौहान यांचा &#...

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveरियाजासाठी लहानपणी वाजवायचे पत्र्याचा डब्बा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छत्तीसगडमधील प्रसिद्ध गायक मदन स...

    नवज्योत सिंग सिद्धूने केला ‘कालीमंदीर’ घ...

    January 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंगळवारी पटियाला येथील श्री काली माता मंदिरा...