1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कोजागिरीनिमित्त 5 लाख लिटर दुधाची होणार विक्री

Spread the love

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. आता सर्वत्र निर्बंध हटविण्यात येत असल्याने काळजी घेत नागरिक सण उत्सव आनंदाने साजरे करू लागले आहेत. आज मंगळवारी कोजागरी पोर्णिमा साजरी करण्यात येत आहे. यासाठी शहरात जवळपास साडे चार ते पाच लाख लिटर दूध विक्री होणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच अनुषंगाने जिल्हा दूध संघाने नियोजनही करून ठेवले असल्याची माहिती जिल्हा दूधसंघाचे व्यवस्थापक पी.बी. पाटील यांनी दिली आहे.

कोजागिरी पौर्णिमेला शहरात लाखो लिटर दुधाची विक्री दरवर्षी होत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोजागरी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सवासह नवरात्रोत्सव, विजया दशमी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यामुळे आजची कोजागरी पौर्णिमाही जोरदार साजरी होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने जिल्हा दूध संघाने नियोजन केले आहे. जिल्हा दूध संघातर्फे नियमीत 30 ते 35 हजार लिटर दूध विक्री होते. यात आता कोजागरीमुळे जवळपास 40 ते 45 हजार लिटर दुधाची अतिरिक्त मागणी राहणार आहे.

मुंबईला पाठविणारे टॅंकर थांबविले

औरंगाबाद जिल्हा दूध संघातर्फे नियमितपणे मुंबईला 15 ते 20 हजार लिटर दूध टॅंकरच्या माध्यमातून पाठविण्यात येते. मंगळवारी साजरी होणारी कोजागरी पौर्णिमानिमित्ताने जिल्हा दूध संघातर्फे मुंबईला पाठविण्यात येणारे सर्व टॅंकर थांबविण्यात आले आहे. हेच दूध आता शहरात कोजागरी निमित्ताने वाटप केले जाणार आहेत. कोजागरीला दुधाची मागणी ज्या प्रमाणे वाढेल त्याच प्रमाणे संकलनही वाढविण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चरणजित सिंग चन्नी पंजाबच्या इतिहासातील पहिले दलित मु...

    September 20th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरांजीत सिंग चन्नी यांनी शपथ घेतली आहे. सुखविंदर सिंग रंधावा आणि ओपी सोनी या...

    कोरोना काळात जे चीन करू शकला नाही ते भारताने करून दा...

    May 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय QUAD शिखर पर...

    SC likely to set up technical committee to probe Peg...

    September 23rd, 2021 | DRISHTI SHARMA

    Spread the loveNagpur: The Supreme Court on Thursday said that it is setting up a technical expert committee to inquire in...