1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सुधारित सातबारा उता-याची प्रत थेट आता खातेदाराच्या हातात

satbara utara
Spread the love

राज्यातील महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे, आज श्रीरामपूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तशी घोषणा केली.

राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहित व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे.

खाते उताराची ही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे. महसूल विभागातील कोतवाल, तलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात दोन ऑक्टोबरपासून सुरू करणार आहेत. आज श्रीरामपूर येथे शासकीय कार्यक्रमानिमित्ताने आले असताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपक्रमाची घोषणा केली. खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘नागपूर – मुंबई बुलेट ट्रेनसाठी माझ्या प...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानव...

    ‘तोडपाणी’ करण्यासाठी सगळं सुरू आहे; पृथ्...

    October 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांवर सध्या ईडी, सीबीआय, आयकर विभाग आदी केंद्रीय तपास ...

    अरेच्चा! समीर वानखेडेच्या नावे ‘बार’ही

    November 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात वाशीमधील ‘त्या’ रेस्ट्रॉ-बारचा उल्लेख राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्य...