1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

टोपीवर तब्बल ७३५ अंडी ठेवत रचला जागतिक विक्रम

Spread the love

आपल्यापैकी कितीजण एका टोपी किती अंडी ठेऊ शकता? याचे तुमचे उत्तर एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन असे असेल. पण आम्ही आज तुम्हाला अशा विश्वविक्रमाबद्दल सांगणार जो ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका व्यक्तीने दोन-तीन नव्हे, तर त्याच्या टोपीच्या वर ७३५ अंडी ठेवून जागतिक विक्रम रचला आहे. त्याचा एक व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटते की या व्यक्तीने हे कसे केले असेल?

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ग्रेगरी दा सिल्वा एकाच कॅपच्या वर ७३५ अंडी घेऊन जात आहेत. ग्रेगरीबद्दल अधिक माहिती देताना, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने म्हटले आहे, गेग्री दा सिल्वा पश्चिम आफ्रिकेतील बेनिनचा रहिवासी आहे. चीनमध्ये सीसीटीव्हीसाठी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या विशेष शो दरम्यान त्याने हा अनोखा विक्रम केला आहे. ग्रेगरीला हा महान विक्रम करण्यासाठी तीन दिवस लागले. व्हिडीओमध्ये, आपण ग्रेगरी अंड्यासह समतोल साधताना पाहू शकता.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर व्हायरल झाला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ ८५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. ही संख्या सतत वाढत आहे. ग्रेगरीची ही थक्क करणारी कामगिरी पाहिल्यानंतर, नेटकरी सतत त्यांचे अभिप्राय देत आहेत. एका वापरकर्त्याने यावर कमेंट करताना लिहिले, हा खरोखरच एक महान रेकॉर्ड आहे. क्वचीतच कोणी तो मोडू शकतो. त्याचवेळी, दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला आहे की ग्रेगरीने त्याच्या डोक्यावर जेवढी अंडी ठेवली आहेत त्याचे वजन किती असेल?

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चीनमध्ये प्रवासी विमान कोसळले!

    March 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:चीनमध्ये (China) एक मोठा विमान अपघात झाला आहे. चीनचं बोइंग 737 विमान क्रॅश (Boeing 737 crash ) होऊन ...

    चीन-तैवान तणाव; ड्रॅगनने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदिवसेंदिवस चीन आणि तैवानमधील तणाव वाढत असून शुक्रवारपासून अनेक वेळा 150 चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई ...

    तालिबानात पुन्हा ‘अल कायदा’ सक्रिय, अमेर...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबान आणि अल कायदा पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये एकत्र येत असल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. अफगाणिस्तान...