1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अमेझॉनचे मालक ‘जेफ बेजोस’ उभारणार खाजगी अंतराळ केंद्र

amazon
Spread the love

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी पहिले खाजगी अंतराळ केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी जेफ बेजोस यांनी इतर काही खाजगी कंपन्यांशीही चर्चा सुरू केली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाने वीस वर्षांपूर्वी उभारलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा कालावधी 2030 मध्ये संपत असतानाच जेफ बेझोस यांनी हा पुढाकार घेतल्याने ही गोष्ट महत्त्वाची मानण्यात येत आहे.

नासाने उभारलेल्या या स्पेसस्टेशन साठी तब्बल शंभर अब्ज डॉलरचा खर्च आला होता. नासा पुन्हा एकदा नव्याने अंतराळ संशोधन केंद्र उभारणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच जेफ बेजोस यांच्या कंपनीने हा प्रस्ताव तयार केला आहे. अमेझॉन कंपनीचा हा प्रस्ताव आरबीटल रिफ या नावाने ओळखला जात आहे.

जेफ बेजोस यांच्या कंपनीने यापूर्वीच अंतराळ पर्यटनाचा निर्णय घेतला असून त्याबाबत पुढाकारही घेतला आहे. अंतराळ संशोधनात संदर्भित बाबींसाठी कंपनीतर्फे दरवर्षी एक अब्ज डॉलरची तरतूदही करण्यात आली आहे.

चीन मधील काही खाजगी कंपन्या ही अंतराळात संशोधनासाठी पुढाकार घेत असतानाच आता अमेझॉन कंपनीनेही पुढाकार घेतला असल्याने या क्षेत्रातही आता स्पर्धा जाणवणार आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Google One VPN, iOS वापरकर्त्यांकरिता येणार …. !

    February 4th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Google One ने iOS (iOS users) वापरकर्त्यांसाठी स्वतःचे VPN (Virtual Private Network) आणण्यास सुरुवा...

    ब्रॉडकॉम क्लाउड सर्व्हिसेस फर्म VMware खरेदी करणार… ...

    May 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: संगणक चिप आणि सॉफ्टवेअर निर्माता ब्रॉडकॉम क्लाउड टेक्नॉलॉजी फर्म VMWare विकत घेण्याच्या तयारीत असल्...

    ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे ११ दावेदार

    July 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love५ सप्टेंबरला घोषणा होण्याची शक्यता? ब्रिटनचे माजी पंतप्रधान ख्रिस पिंचर यांनी लैंगिक छळाच्या आरोपांमुळे आपल...