1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

१४ सप्टेंबरला अँपलचा नवा फोन होणार लाँच

iphone13
Spread the love

मोबाईल उत्पादन क्षेत्रात जगातील दिग्गज टेक कंपनी अँपल iPhone 13 हा फोन कधी लाँच करणार याची अनेकांना प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून आता सप्टेंबर महिन्याच्या १४ तारखेला अँपलचा नवा iPhone 13 फोन भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० च्या सुमारास लाँच करण्यात येणार आहे.

अँपलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपला iPhone 12 लाँच केला होता. त्याला मोबाईल प्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या पुढच्या मॉडेलबद्दल म्हणजे iPhone 13 बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती.

अँपलच्या या नव्या मॉडेलचे लॉन्चिंग गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना आधीच होणार आहे. iPhone 13 च्या चार मॉडेल्सना चीनच्या एका ई-कॉमर्स वेबसाईट ITHome ने सूचिबद्ध केले आहे आणि याची माहिती मायक्रोब्लॉगिंग Weibo वेबसाईटवर देण्यात आली आहे.

आपल्या iPhone 13 चे चार मॉडेल अँपल बाजारपेठेत आणणार आहे. सप्टेंबरच्या १४ तारखेला iPhone 13 सोबतच iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone Pro Max हे चार मॉडेल लाँच करण्यात येणार आहेत. तसेच AirPods 3 देखील लाँच करण्यात येणार आहे.

आयफोन 13 चे आगामी मॉडेल 5G नेटवर्क सपोर्ट आणि पाणी आणि धूळ प्रतिरोधनासाठी IP68 रेटिंगसह येतील.

Claim Free Bets

अँपल गोल्ड, पीच आणि पिंक कलर पर्यायांसह आयफोन 13 सीरीजची मॅट ब्लॅक आवृत्ती लॉन्च करेल.

सिल्व्हर कलर ऑप्शन लाँच करण्याची अपेक्षा करू शकतो.

१७ सप्टेंबरपासून अँपलच्या iPhone 13 मॉडेलचे प्री-बुकिंग सुरु होणार असून त्याची विक्री १४ सप्टेंबरपासून करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या व्यतिरिक्त अद्याप iPhone 13 ची किंमत किंवा इतर फीचर्सबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

पण iPhone 12 च्या किंमतीएवढीच किंमत iPhone 13 ची असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान हा फोन भारतात ऑक्टोबर २०२१ मध्ये लाँच करण्यात येईल याची माहिती समोर आली आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Google Pixel 6A लवकरच भारतात होणार लॉन्च : अहवाल

    May 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : Google ची Pixel 6-सिरीज भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये उपस्थित नाही. Pixel 6 किंवा Pixel 6 Pro घेण...

    गुगल ९ लाखांहून अधिक अँप्सवर घालणार बंदी …!

    May 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: गुगल तब्बल 9 लाखांहून अधिक ॲप्सवर बंदी घालणार आहे, या ॲप्सना Google Play Store वर पुढील अपडेट देण्य...

    चीन-तैवान तणाव; ड्रॅगनने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदिवसेंदिवस चीन आणि तैवानमधील तणाव वाढत असून शुक्रवारपासून अनेक वेळा 150 चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई ...